पाक अफगाणिस्ताननंतर अर्जेंटीना भूकंपाने हादरले

अर्जेंटिना: अर्जेंटिनामध्ये बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने भूकंपाची पुष्टी केली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने, अर्जेंटिनामधील सॅन अँटोनियो डे लॉस कोब्रेसच्या उत्तर-वायव्येस 84 किलोमीटर अंतरावर 6.5 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. यापूर्वी पाक अफगाणिस्तान भूकंपाने हादरले.   युएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. सॅन अँटोनियो डी लॉस कोब्रेस हे वायव्य अर्जेंटिनामधील एक लहान शहर आहे.



चिलीच्या इक्विकमध्ये भूकंपाचे धक्के, 6.3 तीव्रतेची नोंद

बुधवारी चिलीच्या इक्विकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू चिलीच्या इक्विक शहरापासून ५१९ किमी आग्नेय दिशेला होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) ही माहिती दिली. इक्विक हे उत्तर चिलीमधील अटाकामा वाळवंटाच्या पश्चिमेकडील किनारपट्टीचे शहर आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने