सुख-समृद्धीसह सर्वांगीण आरोग्यासाठी प्रार्थना

 कोल्हापूर : सुख-समृद्धीसह सर्वांगीण आरोग्यासाठीची प्रार्थना करत आज सर्वत्र पारंपरिक उत्साहात गुढीपाडवा साजरा झाला. घरोघरी गुढी उभारलीच. त्याशिवाय यानिमित्ताने विविध संकल्पही झाले. दरम्यान, उन्हाळ्यात आरोग्यदायी असणाऱ्या कडुनिंबाची चटणी प्रसाद म्हणून खाण्याची परंपराही जपली गेली. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली.पहाटेपासूनच गुढी उभारण्याची धांदल सुरू झाली. दारात सडा टाकून रांगोळी सजली आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीनेच गुढ्या उभारल्या गेल्या. त्यानंतर पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरू झाली. दुपारी सहकुटुंब सहभोजनावर भर दिला गेला आणि सायंकाळनंतर साऱ्यांचीच पावलं खरेदीसाठी बाजारपेठेकडे वळली.



दरम्यान, अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीने महाद्वार कमानीसमोर भगवी गुढी उभारण्यात आली. विद्यापीठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. धनंजय पठाडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे, आम आदमी पक्षाचे संदीप देसाई, लालासाहेब गायकवाड,उत्तम पाटील, सिटी फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव, मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे, उपाध्यक्ष माहेश्वरी सरनोबत, सचिव सुरेश पाटील, राजू गुप्ता, घनः श्याम पटेल, अनिल माने, धनंजय माळी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने