शिवसेना ही काय निवडणुक आयोगाच्या बापाची...ठाकरेंच्या सभेनंतर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या मोठ्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सभेवर प्रतिक्रिया देत निवडणूक आयोगसह भाजप, शिंदे गटावर निशाणा साधला.



काय म्हणाले संजय राऊत?

काल कोकणात विराट सभा होती. चिन्हा आणि नावं तुम्ही चोरलं असलं तरी लाखो जनता ठाकरेंच्या पाठीशी आहे. खोक्याने जनता विकत घेतली नव्हती. कालच्या सभेने महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला आहे. तुम्ही सभा घेतल्या तरी काही उपयोग नाही. हे सगळं खोक्याचं राजकारण आहे. कोकण आणि शिवसेनेचं अतुट नातं आहे. आता मालेगावला सभा होईलं.जनता किती संतप्त झाली आहे. जी भूमिका ठाकरेंनी मांडली ती स्पष्ट आहे. शिवसेना ही काय निवडणुक आयोगाच्या बापाची नाही. त्यांनी उचलावी आणि दुसऱ्या कुणाला द्यावी. ही जनतेची आहे आणि त्या जनतेचा महासागर काल खेडच्या गोळीबार मैदानात उसळली होती.

शिंदे गटाचे लोक जे काही बोलता त्यांची स्क्रिप्ट भाजप लिहून देते. शिमग्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, आम्ही शिमगा करत नाही. जनता शिंदे गट आणि भाजपचा शिमगा करत आहे. अशोक चव्हाणांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना, हल्ले सुरु आहे. सरकार विरुद्ध बोलणं गुन्हा ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने