फक्त पाण्यानेच नाही तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते होळी

मुंबई: होळी हा सण देशात आणि परदेशातही साजरा होतो. होळीला रंगांचा सण म्हणतात. हा सण प्रामुख्याने भारत आणि नेपाळमध्ये हिंदू धर्मीय साजरा करतात. सामान्यपणे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होतो. पण या सणाला घेऊन काही गोष्टी आहेत ज्या फार कमी जणांना माहित आहेत.



  • होळीशी संबंधित पौराणिक कथा म्हणजे होलिका राक्षशीण आणि भक्त प्रल्हादची. ती बहुतेकांना माहितच असेल.

  • उत्तर प्रदेशात बरसाना शहरात लठ्ठमार होळी साजरी केली जाते. इथे महिला पुरुषांना डंडोसे पीटती है. हे एक खोटं खोटं भांडण असतं.

  • वृंदावन आणि मथुरेत अजून एक प्रथा आहे. फुलांची होळी. तिथे होळीसाठी रंगांऐवजी फुलांनी होळी खेळली जाते.

  • भारतात काही भागात होळीला डोल जात्रा किंवा डोल पौर्णिमा नावानेपण ओळखलं जातं. यात राधा आणि कृष्णाच्या मूर्त्यांना सजवून झोपाळ्यावर बसवलं जातं.

  • होळीच्या नंतर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही भागात रंगपंचमीला रंग खेळले जातात.

  • होळी नेपाळमध्येपण साजरी होते. याला फागु पौर्णिमा किंवा होलीया म्हटलं जातं. हा सण पाणी आणि रंगांनी साजरा होतो. या दिवशी राष्ट्रीय सुट्टीपण असते.

  • परदेशातही हिंदू लोक आपापल्या पद्धतीने होळी साजरी करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने