भारताच्या सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध

 भोपाळ : भारताने भोपाळ येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेमध्ये (रायफल/पिस्तूल) बुधवारी पदकांचे खाते उघडले. सरबज्योत सिंग याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताचे या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले हे विशेष. भारताच्याच वरुण तोमर याने याच प्रकारात ब्राँझपदकावर मोहोर उमटवत पदक संख्या वाढवली.भोपाळमधील एम. पी. शूटिंग अकादमीतील रेंजवर ही स्पर्धा सुरू आहे. अंबाला येथील सरबज्योत या पठ्ठ्याने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधला. मानांकन फेरीमध्ये त्याने शानदार कामगिरी केली.

पात्रता फेरीतील ६० शॉटमध्ये त्याने ५८५ गुणांची कमाई केली. अव्वल आठ स्पर्धकांच्या मानांकन फेरीमध्येही त्याने ठसा उमटवला. सरबज्योतने २५३.२ गुणांची यामध्ये कमाई केली. अखेरच्या शॉटमध्ये त्याने १०.९ गुणांची कमाई करीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. वरुण तोमर याने २५०.३ गुणांची कमाई करीत ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.



चीनला दोन पदके

चीनच्या नेमबाजांना पुरुषांच्या गटात अपयश आले. पण महिलांच्या गटात चीनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. चीनच्या ली सुई हिने दोन वेळची जगज्जेती जर्मनीची डोरीन वीनेकॅम्प हिला १७-५ असे पराभूत करीत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. कियान वेई या चीनच्याच खेळाडूने ब्राँझपदक पटकावले. भारताच्या रिदम सांगवान व मनू भाकेर यांच्याकडून प्रतिमेला साजेशा खेळ झाला नाही.पात्रता फेरीतील ६० शॉटमध्ये त्याने ५८५ गुणांची कमाई केली. अव्वल आठ स्पर्धकांच्या मानांकन फेरीमध्येही त्याने ठसा उमटवला. सरबज्योतने २५३.२ गुणांची यामध्ये कमाई केली. अखेरच्या शॉटमध्ये त्याने १०.९ गुणांची कमाई करीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. वरुण तोमर याने २५०.३ गुणांची कमाई करीत ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.

चीनला दोन पदके

चीनच्या नेमबाजांना पुरुषांच्या गटात अपयश आले. पण महिलांच्या गटात चीनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. चीनच्या ली सुई हिने दोन वेळची जगज्जेती जर्मनीची डोरीन वीनेकॅम्प हिला १७-५ असे पराभूत करीत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. कियान वेई या चीनच्याच खेळाडूने ब्राँझपदक पटकावले. भारताच्या रिदम सांगवान व मनू भाकेर यांच्याकडून प्रतिमेला साजेशा खेळ झाला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने