रामनवमी जवळ येताच सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत होता. सोमवारी अगदी आठवड्याच्या सुरवातीलाच सोन्याचे दर स्थिर होते तर चांदीच्या दरात मात्र घसरण होती. आज मात्र सोन्याच्याही दरात घसरण दिसून येत आहे.गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,710 रुपये तर 24 कॅरेट साठी 59,690,रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 733 रूपये आहे. (Gold silver price update 28 March 2023 )

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 60,400 रुपये

दिल्ली - 59,880 रुपये

हैदराबाद - 59,690 रुपये

कोलकत्ता - 59,690 रुपये

लखनऊ - 60,880 रुपये

मुंबई - 59,690 रुपये

पूणे - 59,690 रुपये

नागपूर -59,690 रुपये



हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने