"कोणतेही पूर्वग्रह न ठेवता मी..."; घर रिकामं करणाऱ्या नोटिशीला राहुल गांधींनी दिलं उत्तर

दिल्ली:  राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना दिलेलं निवासस्थानही आता रिकामं करण्याची नोटीस त्यांना देण्यात आली आहे. त्यांना या नोटिशीला राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे.या नोटिशीला दिलेल्या उत्तरात राहुल गांधी म्हणतात, "गेल्या चार टर्मपासून लोकसभेचा नियुक्त सदस्य म्हणून मी इथे घालवलेल्या आनंददायी आठवणींचा मी ऋणी आहे. माझ्या हक्कांबद्दल कोणतेही पूर्वग्रह न ठेवता मी पत्रातील सूचनांचं नक्कीच पालन करेन."



राहुल गांधींची खासदारकी रद्द

राहुल गांधी यांनी २०१९ साली एक विधान केलं होतं. मोदी नावाचे सगळेच चोर असतात का? असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. यानंतर पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. राहुल गांधी यांनी मोदी समाजाचा आणि ओबीसींचा अपमान केल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता.या याचिकेची दखल घेत सूरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. तसंच आता त्यांना त्यांचं शासकीय निवासस्थान रिकामं करण्याचे आदेशही दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने