ममता बॅनर्जींना मोठा धक्का; 'या' महत्वाच्या निवडणुकीत काँग्रेसनं केला दारुण पराभव

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांच्या नेतृत्वाखालील 'तृणमूल'ला  काँग्रेसच्या हातून धक्के बसत आहेत.नुकत्याच झालेल्या आणखी एका महत्त्वाच्या निवडणुकीत काँग्रेसनं डाव्यांसह टीएमसीचा धुव्वा उडवला. यापूर्वी दोन्ही पक्षांनी मिळून सागरदिघी विधानसभा पोटनिवडणुकीत टीएमसीचा पराभव केला होता.काँग्रेस आणि डाव्यांच्या युतीनं पूर्व मिदनापूरमधील हल्दिया डॉक इन्स्टिट्यूट स्टीयरिंग कमिटीमध्ये (HDISC) टीएमसी शून्यावर आणली आहे. युतीच्या उमेदवारांनी निवडणुकीत सर्व 19 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि टीएमसीचं खातं उघडू शकलं नाही. एचडीआयएससीच्या निवडणुका दर दोन वर्षांनी होत असतात.



तृणमूल, ममता बॅनर्जींना धक्का?

विशेष म्हणजे, गेल्या HDISC निवडणुकीत टीएमसीनं सर्व जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी उलटेच निकाल लागले. पक्षानं येथील सर्व 19 जागांवर उमेदवार उभे केले. माकपचे जिल्हाध्यक्ष निरंजन सिंघी म्हणाले, 'गेल्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. यावेळी मतदारांनी काँग्रेससोबतच्या आमच्या आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.'

पोटनिवडणुकीत CM बॅनर्जींच्या नातेवाईकाचा पराभव

मार्चमध्ये जाहीर झालेल्या सागरदिघी पोटनिवडणुकीच्या निकालांनी टीएमसीसाठी वाईट बातमी आणली होती. पक्षाचे उमेदवार आणि सीएम बॅनर्जी यांचे दूरचे नातेवाईक असलेल्या देबाशिष बॅनर्जी यांचा काँग्रेस उमेदवार बॅरन विश्वास यांनी सुमारे 23,000 मतांनी पराभव केला. यासह पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेसचं खातं उघडलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने