शेवटाचा कसोटी सामना ड्रॉ झाला तर काय होणार WTC फायनलमध्ये? जाणून घ्या समीकरणं

मुंबई:  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटी सामन्यात टीम इंडियाला नऊ विकेट्सनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी76 धावांचे लक्ष्य दिले होते, जे खेळाच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात गाठले. आता दोन्ही संघांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे.ऑस्ट्रेलियन संघाने शानदार विजय मिळवत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचबरोबर या पराभवामुळे भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची प्रतीक्षा थोडीशी वाढली आहे. आता अहमदाबाद कसोटी जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. अहमदाबादमध्ये भारतीय संघ जिंकला तर अंतिम फेरीत पोहोचेल.



अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिल्यास टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामना अनिर्णित राहिला, तर भारतासमोर संकट येऊ शकते. अशा स्थितीत श्रीलंकेसाठी दरवाजे उघडतील आणि न्यूझीलंडविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकून ती अंतिम फेरी गाठू शकेल.चांगली गोष्ट म्हणजे अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली किंवा ऑस्ट्रेलिया जिंकला तरीही टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकते. पण यासाठी भारताला प्रार्थना करावी लागेल की न्यूझीलंड संघ श्रीलंकेविरुद्धचा एक तरी सामना जिंकेल किंवा अनिर्णित राखेल. अशा स्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे.

असं असलं तरी घरच्या मैदानावर होणाऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला हरवणं श्रीलंकेसाठी खूप कठीण असेल. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 मार्चपासून खेळल्या जाणार आहे.इंदूर कसोटी सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारताविरुद्धचा शेवटचा सामना गमावल्यासही ऑस्ट्रेलियन संघाची स्थिती पूर्वीसारखीच असणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाला सध्या 68.52 टक्के गुण आहेत, तर भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हल येथे 7 जूनपासून खेळल्या जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने