कदाचित हे माझं शेवटचं पत्र...डोनाल्ड ट्रम्प यांना आज अटक होणार; काय आहे प्रकरण

न्यूयॉर्क: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज त्यांना अटक होणार असल्याची धक्कादायक माहिती स्वतः दिली होती. मंगळवारी अटक केली जाऊ शकते, असं ट्रम्प दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. तसेच समर्थकांनी अटकेचा विरोध करावा असे आवाहनही त्यांनी केले होते.न्यूयॉर्कच्या काही महिलांना देण्यात आलेल्या पैशांच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणी आज ट्रम्प यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना ई मेल पाठवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.ई-मेलमध्ये कदाचित हे माझं शेवटचं पत्र असू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल आभार. या लढाईत विजय आपलाच होईल आणि आपण पुन्हा व्हाईट हाऊस जिंकू, असंही ट्रम्प यांनी समर्थकांना केलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.



दोन दिवसांपूर्वी...

सोशल मीडिया नेटवर्कवर एक पोस्ट लिहिली होती. मॅनहट्टनच्या जिल्हा अटॉर्नी कार्यालयातून अवैधरित्या लीक झालेल्या माहितीतून अटकेचे संकेत मिळाल्याचं त्यांनी म्हटलं होते.

नेमकं काय आहे प्रकरण?

हे प्रकरण पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित आहे. तिचे खरे नाव स्टेफनी क्लिफर्ड आहे. तिचे म्हणणे आहे की, तिचे ट्रम्प यांच्यासोबत 10 वर्षांपूर्वी अफेअर होते. मात्र ट्रम्प यांनी असं काही नसल्याचं म्हटलं आहे.ट्रम्प यांनी स्टॉर्मीला तिचे आणि त्यांचे लैंगिक संबंधांबद्दल मौन बाळगण्यासाठी 1.30 लाख डॉलर्स दिले होते, असा आरोप आहे. याच प्रकरणी आता चौकशी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने