Amazonच्या सीईओंचा कर्मचाऱ्यांना पुन्हा झटका! ई-मेल पाठवला अन्...

 नवी दिल्ली : Amazonमध्ये पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात होणार आहे. यावेळी अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना थेट ई-मेलद्वारे कामावरुन काढून टाकलं आहे.अॅमेझॉनमध्ये दुसऱ्यांना होत असलेल्या या नव्या कर्मचारी कपातीमध्ये ९००० जणांना नोकरी गमवावी लागणार आहे. ही नवी कर्मचारी कपात अॅमेझॉनच्या विविध विभागांमध्ये केली जाणार आहे. या कपातीचा AWS, PXT, Advertising आणि Twitch या विभागांना फटका बसणार आहे. सीईओ अँडी जॅसी यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये याची माहिती दिली आहे.



कॉस्ट कटिंगसाठी जानेवारी महिन्यात अॅमेझॉननं १८००० कर्मचारी कपात केली होती. जॅसी यांनी हे देखील सांगितलंय की, कंपनीनं पहिल्या फेरीत कपातीची घोषणा केली नाही कारण विभागांमधील सर्व कर्मचार्‍यांचे अंतर्गत मूल्यांकन पूर्ण झाले नव्हते.मूल्यांकन आता पूर्ण झालं असल्यानं कंपनी आणखी 9,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. यामुळं अॅमेझॉन जगभरातील 27,000 कर्मचारी कपात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने