कोणत्या दिशेला गुढी उभारणं शुभ मानलं जातं, जाणून घ्या मुहूर्त अन् दिशा

मुंबई:  हिंदू धर्माचं नवं वर्ष गुढी पाडव्यापासून सुरु होतं. हा सण हिंदू कॅलेंडरच्या नव्या वर्षात आणि चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो. या दिवशी काही धार्मिक गोष्टींचंही पालन करायचं असतं. जसे की गुढी नेमकी कोणत्या दिशेला उभारावीत. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.



गुढी पाडवा 2023 मुहूर्त

प्रतिपदा तिथी 21 मार्च रोजी रात्री 10.52 वाजता सुरु होईल आणि 22 मार्च रोजी रात्री 8.20 ला समाप्त होईल. 22 मार्चला सकाळी 6.29 ते 7.39 पर्यंत पूजा मुहूर्त असणार आहे.

गुढी पाडव्याला पूजेची योग्य पद्धत

ब्रम्ह मुहूर्तावर सुगंधी तेल लावून अंघोळ करावी. यानंतर ब्रम्हदेवाची पूजा करावी. या दिवशी ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केल्याचे पुराणात आढळते. घरातील सर्व सदस्यांनी मुहूर्ताच्या वेळी ब्रम्हदेवाची पूजा करावी. यानंतर घराचा मुख्य दरवाजा आंबा किंवा अशोकाची पाने आणि फुलांनी सजवावा. मुख्य गेटवर आणि घराच्या अंगणात रांगोळी काढली जाते.या दिवशी गुढी उभारण्याची पद्धत माहिती असणे फार महत्वाचे आहे. घराच्या मुख्य दारावर खांबाला पितळेचे भांडे किंवा कोणतेही भांडे उलटे टांगून त्यावर लाल, पिवळे किंवा भगवे रेशमी कापड बांधले जाते. गुढीपाडव्याला दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. बांबूच्या काठीवर कलश उलटा ठेवून ध्वज फडकवणे विजयाचे प्रतिक मानले जाते. या गुढीस ब्रम्हध्वज असे म्हणतात. या दिवशी पुरणपोळी, गोड भाकरी आणि गूळ देवाला अर्पण केला जातो. दुढीपाडव्याच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन प्रसाद ग्रहण करत देवाचे आभार मानले पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने