पॅनकार्ड आधारला लिंक केलं नाही? केंद्र सरकारने दूर केली काळजी

मुंबई:  केंद्र सरकारने पॅनकार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याची अंतिम मुदत आता वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने याबद्दल निवेदन जारी करून याबद्दलची माहिती दिली आहे.अजून तुम्ही जर पॅन-आधार लिंक केलं नसेल, तर त्यासाठी तुम्हाला ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. या तीन महिन्यांत तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करता येणार आहे. करचोरीला आळा घालण्यासाठी पॅन-आधार लिंकिंग आवश्यक असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.या मुदतीनंतर मात्र तुम्ही हे लिंक केलं नाही, तर तुमचं पॅनकार्ड निष्क्रिय होईल. याआधी पॅन-आधार लिंकिंगची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ होती. मात्र आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने