भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा; कॉलेजमध्ये प्रवेश न घेताच देता येणार MBBS ची परीक्षा

मुंबई:  भारतात परतलेल्या युक्रेनच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, आता युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश न घेता एमबीबीएस भाग १ आणि २ उत्तीर्ण करण्याची शेवटची संधी दिली जाईल.काही ठरलेल्या सरकारी महाविद्यालयात प्रॅक्टिकल परीक्षा ही भारतीय एमबीबीएस अभ्यासक्रमाप्रमाणे असेल. परीक्षेनंतर रोटरी इंटर्नशीप दोन वर्षांसाठी अनिवार्य आहे. असा पर्याय देण्याची ही एकमेव वेळ आहे, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने