तुम्ही दोघं आनंदात, ऐश्वर्यात राहा! आपच्या खासदाराचा शेवटी परिणीती-राघवच्या नात्याबाबत खुलासा

मुंबई: चित्रपट अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा हे त्याच्या वैयक्तिक आयूष्यामुळे चर्चेत आहेत. दोघेही नुकतेच एकत्र डिनरला गलेले दिसले. त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आले होते.त्या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे का अशी तरी बातमी सर्वत्र पसरली होती. आता परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या डेटींगच्या चर्चेदरम्यान आता आप खासदार संजीव अरोरा यांनी त्यांच्या ट्विटद्वारे दोघांच्या नात्याची पुष्टी केली आहे.

संजीव अरोरा यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढाचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी या दोघांच्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले - मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला आशा आहे की दोघांचा सहवास हा प्रेमाने भरलेला असो. तुम्ही दोघं आनंदात, ऐश्वर्यात राहा. माझ्या शुभेच्छा!जेव्हा ते रेस्टॉरंटच्या बाहेर एकत्र स्पॉट झाले होते, तेव्हा त्यांच्या नात्याबद्दल अंदाज लावले जात होते. त्यानंतर संसदेबाहेर परिणीतीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राघव चढ्ढा म्हणाले होते की, परिणीतीबद्दल नाही तर राजकारणीतीबद्दल प्रश्न विचारा असं ते म्हणाले होते.



राघव चढ्ढा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, दोघे नुकतेच जेवायला बाहेर गेले होते जेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाची चर्चा सुरू केली होती. ते एकमेकांना ओळखत आहेत, एकमेकांना पसंत करतात आणि त्यांच्यामध्ये सर्वकाही चांगले आहे. त्यांचे कुटुंबीय एकमेकांना काही काळापासून ओळखत आहेत.जर सूत्रांवर विश्वास ठेवला तर लवकरच दोघांचा साखरपुडा होऊ शकतो. याबाबत कुटुंबीय औपचारिक घोषणा करतील. अशाही बातम्या समोर आल्या होत्या.त्यानंतर परिणीतीला मनीष मल्होत्राच्या ऑफिस बाहेरही स्पॉट झाली होती. त्यामुळे त्याच्या लग्नाची चर्चांना उधाण आले आहे.परिणीती आणि राघव दोघेही जानेवारीत लंडनमध्ये झालेल्या पहिल्या इंडिया यूके आऊटस्टँडिंग अचिव्हर्स अवॉर्ड्समध्ये सहभागी झाले होते. ब्रिटीश विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमात ते ७५ पुरस्कार विजेत्यांपैकी एक होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने