किरण खेरनंतर 'या' भट्ट अभिनेत्रीलाही कोरोनाची लागण!

मुंबई: भारतात पुन्हा एकदा कोरोना डोक वर काढतोय. रोजच कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. नुकतच अभिनेत्री किरण खेर काही दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली होती.त्यानंतर आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्टलाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तिनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे.यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून लोकांना आवाहन केले की, जो कोणी त्यांच्या संपर्कात आला असेल त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी.



अभिनेत्रीने लिहिले की, 'तीन वर्षांनंतर मी पहिल्यांदा पॉझिटिव्ह आढळले आहे. तुम्ही सर्व मास्क घाला. कोरोना अजूनही जवळपास आहे आणि संपूर्ण लसीकरण पूजा भट्ट चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मोठी मुलगी आहे. पूजा भट्टने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनेत्री शेवटची चुप चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सनी देओलसह अनेक स्टार्स दिसले होते. पूजा भट्ट सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मुक्तपणे मांडते.करूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आशा आहे की मी लवकरच माझ्या पायावर परतेन'.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने