नागालँडमध्ये NCPच्या 7 आमदारांनी विरोध केला होता,पण...; पवारांनी सांगितलं खरं कारण

नाशिकः नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिल्याने शरद पवार यांच्यावर टीकास्र सोडलं जात आहे. यासंदर्भात आज त्यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केलीय. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते.नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला इतर छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.




राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यावरुनच मनसेने राष्ट्रवादीच्या भूमिकेवर खोचक टीका केली. या निवडणुकीत महाराष्ट्रातील इतर २ पक्षांनीही जागा मिळवल्या आहेत. यामध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआयने 2 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवला.आज नाशिकमध्ये बोलतांना शरद पवार म्हणाले की, आमच्या सात आमदारांना भाजपसोबत जाण्यास विरोधच केलेला होता. मात्र नागालँडमधली परिस्थिती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. नागालँडमध्ये कुठलाच पक्ष बाहेर राहिलेला नाीह. नागालँडमध्ये नागा लोकांचं इश्यू आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेमध्ये ऐक्य म्हत्वाचं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर सर्वांना सोबत राहण्याचा विचार केला आहे. त्यामुळे भाजपसोबत आम्ही गेलो, असा त्याचा अर्थ होत नाही; अशी भूमिका पवारांना स्पष्ट केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने