CM शिंदेनी "वाचून" दाखवली राहुल गांधींवरची टीका; लिहून दिलं की लिहून आणलं? चर्चेला उधाण

मुंबईः राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने देशभर गदारोळ सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींचा समाचार घेतला. मात्र यावेळी मुख्यमंत्री शिंदेंना लिहून दिलेलं वाचावं लागत होतं. शिंदेंनी राहुल गांधींवरची टीका वाचून दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.



एकनाथ शिंदे यांनी वाचून दाखवलेले मुद्दे

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळेच आज आपण आणि राहुल गांधी स्वातंत्र्य उपभोगत आहेत

  • राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहावं, परंतु त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा कराव्यात

  • ते वारंवार सागतात, मी सावकर नाही मी गांधी आहे. तुम्ही काय सावरकर होणार? त्यासाठी त्याग आणि प्रेम असावं लागेल

  • तुम्ही परदेशात जावून देशाची बदनामी करता, त्यामुळे तुमच्याडून काय अपेक्षा करणार?

  • सावरकर हे केवळ महाराष्ट्राचं दैवत नसून संपूर्ण देशाचे दैवत आहेत. तरीही अधिवेशनात राहुल गांधींच्या विरोधात 'त्यांनी' एकही शब्द काढला नाही

  • ठाकरे म्हणाले, सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. परंतु अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार?

  • आम्ही विधानसभेच्या बाहेर केलेलं आंदोलन म्हणजे संताप आहे. चुकीच्या विधानांमुळे आलेली ती चीड आहे

  • सावरकरांचं देशाप्रती जे काम आहे, त्यांच्या समर्पित भावाची आठवण म्हणून राज्यभर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे

उद्धव ठाकरेंनी मालेगाव मधील सभेत केलेल्या विधानावर शिंदे म्हणाले, तुम्ही सावकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे काय करणार आहात, उशिरा सुचलेले शहाणपण असतं त्या प्रमाणे हे बोलले गेले. फक्त बोलून काय होणार काय होणार आहे तुमच्या कृतीतून ते दिसलं पाहिजे. असं शिंदे म्हणाले. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बाबत केलेल्या विधानावरून राज्यभर सावरकर प्रेमी निषेध करत आहेत, कारण सावरकर हे देश भक्त होते, त्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, असं शिंदे म्हणाले.दरम्यान, पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कागद वाचून मुद्दे सांगितल्याने त्यांना कुणी लिहून दिलं होतं की त्यांनीच ते लिहून आणलं होतं? असे प्रश्न सोशल मीडियामध्ये उपस्थित होत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने