गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने गाठला विक्रमी उच्चांक; चांदीमध्येही मोठी वाढ

मुंबई: जगभरातील बँकिंग व्यवस्थेच्या अस्थिरतेमुळे सराफा बाजाराच्या व्यवहारात मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. एमसीएक्सवर सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. एमसीएक्सवर सोन्याने प्रथमच 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅमचा भाव ओलांडला आहे. चांदीमध्येही जोरदार तेजी दिसून येत आहे.आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या जवळ आला आहे. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. सराफा बाजारात सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपयांच्या वर आहे.सोन्याचा भाव 1,451 रुपयांनी वाढला. गेल्या शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,220 वर बंद झाला होता. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. (Gold Silver Price Latest update 20 March 2023)

सोने 60,000 रुपयांच्या जवळ आहे :

आज 20 मार्च रोजी सोन्याचा भाव 59,671 रुपयांच्या वर आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात.22 कॅरेट सोने 1330 रुपयांच्या वर चढून 54,659 रुपयांवर व्यवहार करत आहे. तुम्हीही सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की जाणून घ्या.



सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर :

जागतिक कमोडिटी मार्केटमधील हालचालींमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सराफा बाजारातही सोन्याचे भाव वाढले आहेत.HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, 17 मार्च रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 400 रुपयांनी वाढून 58,040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता.

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 60,650 रुपये

दिल्ली - 59,930 रुपये

हैदराबाद - 59,780 रुपये

कोलकत्ता - 59,780 रुपये

लखनऊ - 59,930 रुपये

मुंबई - 59,780 रुपये

पुणे - 59,780 रुपये

नागपूर - 59,780 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने