शरद पवारांनी राहुल गांधींचे टोचले कानं, म्हणाले...

मुंबई: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. त्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत,' असं वक्तव्य केलं. त्यानंतर देशासह राज्यभरात चांगलाच वाद पेटला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई:   विरोधकांच्या झालेल्या बैठकीत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर भूमिका मांडली आहे. 'सावरकर आणि आरएसस यांचा संबंध नाही. सावरकरांना माफीवीर म्हणणंही योग्य नाही.सावरकरांचा मुद्दा सोडून अनेक मुदद्दे आपल्या समोर आहेत. यावर चर्चा व्हावी.' पवारांच्या या मुद्याचे खासदारांनीही समर्थन केलं.त्यानंतर राहुल गांधी यांनीही पवारांच्या मताचा मी आदर करतो असं बैठकीत म्हटलं आहे.




आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्याकरिता विरोधी पक्षांची एक बैठक काल दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वतः सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी तसेच शरद पवार यासोबत अन्य समाजवादी, जेडीयु खासदार उपस्थित होते.त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस नेते आता सावरकर यांच्या मुद्द्याला बगल देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली खासदारकी गेल्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राजस्थान व छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसमवेत आलेले राहुल माफी मागण्याच्या मुद्द्यावर म्हणाले, ‘माझे नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागत नाहीत.’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने