भारतातून पळून गेलेले गुन्हेगार परदेशात सुरक्षित वास्तव्य कसे करतात ?

मुंबई : नीरव मोदी, अबू सालेम, मेहुल चोक्सी यांसारखे कितीतरी गुन्हेगार आहेत ज्यांनी भारतातून पळ काढला आणि आता परदेशात स्थायिक झाले आहेत. मेहुल चोकसीबाबत अलीकडेच आंतरराष्ट्रीय पोलीस दलाने रेड कॉर्नर नोटीस हटवली आहे.यामुळे कदाचित पीएनबी घोटाळ्यातील हा आरोपी निर्दोष सुटू शकतो. अशीच सूट अनेक आरोपींना मिळालेली आहे. गुन्हा करून परदेशात पळून गेल्यानंतर आरोपींना कायद्यातील पळवाटा शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

पळून गेलेल्या आरोपींना पकडतात कसं ?

यासाठी एक्स्ट्राडिक्शन ट्रीटी म्हणजेच प्रत्यार्पण संधीचा वापर केला जातो. प्रत्यार्पण म्हणजे एखादी गोष्ट परत करणे. आपल्याकडे दुसऱ्याची एखादी गोष्ट असेल तर ती त्या व्यक्तीने मागितल्यावर परत केली जाते. यालाच प्रत्यार्पण म्हणतात.आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारांचे प्रत्यार्पण केले जाते. यासाठी दोन देशांमध्ये करार केला जातो. त्यानुसार त्यांच्या देशांतील गुन्हेगार दुसऱ्या देशात गेल्यास त्याचा ताबा मातृदेशाकडे दिला जातो.पण हे सगळं इतकं सोपं नाही. गुन्हेगार वास्तव्यास असलेल्या देशातील न्यायालयात याचिका दाखल करतो व मातृदेशात गेल्याने जिवाला धोका असल्याचे सांगतो. तसेच मातृदेशातील वातावरण आरोग्यासाठी चांगले नसल्याचेही सांगितले जाते.अशाप्रकारे आरोपी वेळकाढूपणा करतो. ज्या देशात गुन्हा घडलेला असतो त्या देशातील सरकार बदलते तेव्हाही या प्रत्यार्पणावर परिणाम होतो.

गुन्हेगारांना आश्रय का दिला जातो ?

गुन्हेगार आर्थिक घोटाळा करून पळाला असेल तर त्याच्याकडे भरपूर पैसा असतो. हा पैसा तो गुन्हेगार परदेशात गुंतवतो. याचा फायदा त्या देशाला मिळत असल्याने गुन्हेगाराला काही काळ आश्रय मिळतो.

इंटरपोल

एखादा पळून गेलेला गुन्हेगार परदेशात लपला आहे असल्यास भारत इंटरपोलची मदत घेऊ शकतो. इंटरपोल ही पोलिसांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. त्याचे मुख्यालय फ्रान्समध्ये आहे.आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांची धरपकड करणे हे इंटरपोलचे काम असते. इंटरपोलतर्फे रेड कॉर्नर नोटीस काढली जाते. ही नोटीस इंटरपोलच्या सदस्य देशांकडे जाते. आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढणे हा या नोटिशीचा उद्देश असतो.ब्ल्यू कॉर्नर नोटिशीद्वारे आरोपीच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जाते. यलो कॉर्नर नोटिशीद्वारे अपहरण झालेल्या तसेच काही कारणांमुळे बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेतला जातो.एखादी विशेष व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीची असून तिच्यापासून धोका असल्याचे सांगण्यासाठी ऑरेंज नोटीस दिली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने