हार्वर्ड -कँब्रिजमधून शिकलेल्या राहुल गांधींना पप्पू ठरवलं पण, तो...; प्रियांका यांचा भाजपवर

नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी (26 मार्च 2023) आपला भाऊ राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून संबोधल्याबद्दल भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. 2019 च्या मानहानी प्रकरणात राहुल यांना दोषी ठरवून लोकसभेतून अपात्र ठरविल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी यांचे स्मारक असलेल्या राजघाट येथे काँग्रेस संकल्प सत्याग्रहाला प्रियांका संबोधित करत होत्या.प्रियांका म्हणाल्या, "संसदेत माझ्या शहीद वडिलांचा अपमान केला. शहिदाच्या मुलाला 'मीर जाफर' म्हटल गेलं. भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, राहुल गांधींचे वडील कोणार आहे ? पंतप्रधानांनी संसदेत 'नेहरू आडनावा'वरून प्रश्न उपस्थित केले? तरी, तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही किंवा तुमचे सदस्यत्व रद्द झाले नाही.



प्रियांका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी हार्वर्ड आणि केंब्रिज विद्यापीठ या जगातील दोन प्रतिष्ठित संस्थांमधून पदवी पूर्ण केली आहे. पण भाजपचे लोक त्यांना 'पप्पू' म्हणतात. परंतु जेव्हा लाखो लोक त्यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत आले, तेव्हा भाजपवाल्यांना समजलं की, ते 'पप्पू' नाहीत. राहुल सामान्य लोकांचे प्रश्न समजून घेतात.प्रियांका गांधी म्हणाल्या की, राहुल गांधी संसदेत असे प्रश्न उपस्थित करत होते, ज्याची उत्तरे मोदी सरकारकडे नाहीत म्हणून ते (मोदी) घाबरले. वेळ आली असून यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी राजघाटावरील संकल्प सत्याग्रहाच्या वेळी सांगितले.'माझ्या कुटुंबाच्या रक्ताने या देशात लोकशाही मजबूत झाली आहे. या देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. काँग्रेसच्या महान नेत्यांनी या देशात लोकशाहीचा पाया रचला आहे. जर त्यांना वाटत असेल की ते आम्हाला घाबरवू शकतात, तर ते चुक आहेत, आम्ही घाबरणार नाही, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने