रामसेतु दर्शनसाठी समुद्रात भिंत बांधण्याची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

दिल्ली: हिंदू धर्मात तसेच रामायणात अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या राम सेतु बद्दल सर्वोच्च न्यायालयात एक महत्वपूर्ण याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये भाविकांना मोक्षाची हमी देणाऱ्या रामसेतूचे दर्शन घेण्याकरीता समुद्रात काही मीटर/किलोमीटर अंतराची भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली आहे.



सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या या याचिकेत म्हटले आहे की,ज्या पुलावरून भगवान श्री राम त्याच्या सैन्यासह लंकेत रावणाचा वध करण्यासाठी आणि लंकेतरामराज्य स्थापन करण्यासाठी गेले होते; या भिंतीच्या बांधकामामुळे कोट्यवधी लोकांची त्या पुलावर चालण्याची, बसण्याची आणि झोपण्याची इच्छा पूर्ण होईल. याचिकेत रामसेतूला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने