राहुल गांधींना त्यांचे वडील कोण?, 32 वर्ष जुनी आठवण सांगत प्रियांका गांधींनी PM मोदींना सुनावलं

दिल्ली: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दिल्लीत आयोजित संकल्प सत्याग्रहदरम्यान प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांची ३२ वर्ष जुनी आठवण सांगत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगलचं सुनावलं.या देशाची लोकशाही माझ्या कुटुंबाच्या रक्ताने मोठी केली आहे असं प्रियांका गांधी यांनी यावेळी म्हटलं. तसंच केंद्रीय मंत्र्यांकडून वारंवार गांधी कुटुंबाचा अपमान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी 32 वर्ष जुनी आठवण सांगितली.



काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

1991 मध्ये माझ्या वडिलांची अंत्ययात्रा तीन मूर्ती भवन येथून निघत होती. मी आपल्या आई आणि भावासोबत गाडीत बसलेली होती. समोर भारतीय लष्कराचा ट्रक होता. ट्रक पूर्पणणे फुलांनी भरलेला होता. त्या ट्रकमध्ये माझ्या वडिलांचा मृतदेह होता. थोड्या वेळानंतर राहुल गांधी यांनीे मला गाडीतून उतरायचं असल्याचं सांगितलं. तेव्हा माझ्या आईने सुरक्षेचा मुद्दा असल्याने नाही म्हटलं.पण नंतर राहुल गांधी गाडीतून खाली उतरले आणि लष्कराच्या मागून चालू लागले. कडक उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेत चालत चालत तो इथे पोहोचला. या जागेपासून 500 फुटांच्या अंतरावर माझ्या भावाने वडिलांवर अंत्यसंस्कार केले, अशी आठवण प्रियांका गांधींनी सांगितली.तो क्षण आजही माझ्या आठवणीत तसाच आहे. माझ्या वडिलांचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळलेला होता. त्याच्या मागे चालत चालत माझा भाऊ इथपर्यंत आला होता. पण आमच्या शहीद वडिलांचा वारंवार अपमान केला जातो.शहीदाच्या मुलाला तुम्ही देशद्रोही, मीर जाफर म्हणता आणि त्याच्या आईचा अपमान करा. केंद्र सरकार भरसंसदेत माझ्या आईचा अपमान करतं. एक मंत्री राहुल गांधींना त्यांचे वडील कोण आहेत माहिती नाही असं म्हणतो," असा संताप प्रियांका गांधी यांनी व्यक्त केला.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी कुटुंब नेहरु आडनाव का लावत नाही अशी विचारणा करतं. तुमच्यावर तर कोणती केस होत नाही, तुमचं सदस्यत्व रद्द होत नाही," अशी टीका प्रियांका गांधींनी केली.पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ते नेहमी आमच्या कुटुंबाचा अपमान करतात. संसदेत माझ्या भावाने मोदींची गळाभेट घेतली आणि तुमचा द्वेष करत नाही असं सांगितलं. आमची विचारसरणी वेगळी आहे. आमची द्वेषाची विचारसरणी नाही. असे सांगत परिवारवादी मुद्दाही उपस्थित केला.जर तुम्ही आम्हाला परिवारवादी म्हणत असाल तर प्रभू राम कोण होते? त्यांनी आपल्या कुटुंबाप्रती आपला धर्म पाळला, मग ते परिवारवादी होते का? पांडव त्यांच्या कौटुंबिक मूल्यांसाठी लढले म्हणून ते कुटुंबवादी होते का? असे सवाल प्रियंका गांधींनी केले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने