PM मोदींच्या भेटीनंतर जपानचे पंतप्रधान अचानक भारतातून युक्रेनला रवाना; नेमकं काय झालं?

दिल्ली:  जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा 20 मार्चपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले. मात्र, येथून ते अचानक युक्रेनच्या  दौऱ्यावर जात आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलीये.असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, फुमियो किशिदा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की  यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज (मंगळवार) पहाटे कीवला गेले आहेत.नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांची भेट घेतल्यानंतर, काही तासांनी किशिदा युक्रेनला अचानक भेट देण्यासाठी रवाना झाले. मे महिन्यात होणाऱ्या G-7 शिखर परिषदेचं अध्यक्षपद भूषवणारे किशिदा हे एकमेव G-7 नेते आहेत, ज्यांनी युक्रेनला भेट दिली नाही.



रशियावर निर्बंध लादण्यात आणि रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यावर युक्रेनला पाठिंबा देण्यामध्ये जपान इतर जी-7 देशांच्या बरोबरीनं काम करत आहे. किशिदा यांनी झेलेन्स्कीसोबतच्या भेटीत युक्रेनला पाठिंबा देण्याची अपेक्षा आहे.यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अचानक युक्रेन दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. अमेरिका युक्रेनच्या पाठीशी उभी असल्याचं बायडेन म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने