राहुल यांच्यानंतर BJPच्या रडारवर प्रियांका; 'या' मुद्दावरून वाढू शकतात अडचणी

नवी दिल्ली: राहुल गांधी यांना दोषी ठरवल्यानंतर आणि त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यापासून संपूर्ण गांधी कुटुंबावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. त्यातच भाजपने काँग्रेस फाईल्स म्हणून मोहिम सुरू केली आहे. यात १८४ सेकंदाचा एक व्हिडिओ प्रसिद्ध करून ७० वर्षांत काँग्रेसने लूट केल्याचा तपशील दिला आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपने व्हिडिओच्या शेवटी म्हटले की, 'पिक्चऱ अभी बाकी है'. भाजपने येस बँकेचे राणा कपूर आणि प्रियांका गांधी यांचा व्हिडीओमध्ये उल्लेख केला आहे.येस बँकेच्या राणा कपूर यांना एमएफ हुसेन यांचे पेंटिंग चढ्या भावाने खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप प्रियांका यांच्यावर आहे. राणा कपूर यांनी दावा केला होता की, मिलिंद देवरा यांनी नंतर त्यांना सांगितले की गांधी कुटुंबाने पेंटीगच्या पैशातून न्यूयॉर्कमध्ये सोनिया गांधी यांच्यावर उपचार केला.



राणा कपूर यांनी ईडीला सांगितले होते की, यूपीए सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री असलेले मुरली देवरा यांनी त्यांना सांगितले होते की, जर त्यांनी एमएफ हुसेन यांचे पेंटिंग खरेदी करण्यास नकार दिला तर गांधी कुटुंबीय नाराज होऊ शकत. शिवाय त्यांना पद्मभूषण पुरस्कारही मिळणार नाही.ईडीनुसार राणा कपूर यांनी सांगितलं की, त्यांनी चेकद्वारे 2 कोटी रुपये भरले. सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अहमद पटेल यांनी राणा कपूर यांना सांगितले होते की, सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी योग्य वेळी गांधी कुटुंबाला मदत करून आपण चांगले काम केले आहे. त्यामुळे आगामी काळात पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाईल. मार्च २०२० अटक झाल्यापासून बँकर राणा न्यायालयीन कोठडीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने