Laxmikant Berde यांच्या घरी गेलेल्या निवेदिता सराफनी घाबरुन आईला केलेला फोन..बेर्डेंनाही फुटलेला घाम..

मुंबई: सोशल मीडियावर अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे,ज्यात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी भरभरुन बोलत अनेक किस्से शेअर केले आहेत.लक्ष्मीकांत बेर्डे,अशोक सराफ,सचिन पिळगावकर,महेश कोठारे हे मराठी इंडस्ट्रीत फक्त एकमेकांसोबत काम करणारे कलाकार नव्हते तर त्यांच्यात घनिष्ठ मैत्रीही होती. अर्थात त्यामुळे यांच्या पत्नी असलेल्या अभिनेत्री देखील या चौघांच्या ग्रुपमध्ये लग्नाआधीपासून सामिल होत्या.

निवेदिता सराफ या तर अशोक सराफ यांच्या आधीपासून लक्ष्मीकांत बर्डेंना ओळखायच्या असं त्या म्हणाल्या. त्यांनी एकत्र खूप कामं केली आहेत. त्या दरम्यानचा एक किस्सा निवेदिता सराफ यांनी झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात आल्या असताना शेअर केला होता. निवेदिता सराफ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक भन्नाट किस्सा शेअर करताना म्हणाल्या, ''एकदा मी लक्ष्मीकांतच्या अंधेरीतल्या वीरा देसाई रोड वरच्या घरी गेले होते. तेव्हा मी आईला तिथून फोन लावला आणि म्हणाले,'मी लक्ष्मीकांतच्या घरी आले आहे...', एवढं सांगतेय तितक्यात समोरुन एक झुरळ उडत आलं आणि मी फोनवरच जोरात किंचाळले..आणि आईशी बोलता बोलता फोन घाबरत भिरकावून दिल्यानं कट झाला''.



''तेव्हा मोबाईल नव्हते..लॅंडलाईनवरनं फोन लावला होता. त्यानंतर लक्ष्मीकांतचा चेहरा पाहण्यासारखा होता..त्याचा सेन्स ऑफ ह्युमर मात्र जबरदस्त..तो पहिलं मला म्हणाला,बाई आईला आधी फोन कर आणि सांग झुरळ आलं म्हणून किंचाळले..नाहीतर तुझ्या आईला काहीतरी भलतंच वाटेल''.भन्नाट किस्सा सांगितल्यावर निवेदिता सराफच नाहीत तर तो ऐकणारा शो मधील प्रत्येक उपस्थित जोरजोरात हसू लागला.

आज लक्ष्मीकांत बर्डे हयात नसले तरी त्यांनी त्यांच्या अभिनयानं जीवंत केलेल्या कलाकृती चाहत्यांना आजही पोट धरून हसवतात. मराठी नाटक,मालिका,सिनेमाच नाही तर हिंदी सिनेमांमधूनही लक्ष्मीकांत बेर्डेंनी आपलं नाव कमावलंय. आजही हिंदीत असे बडे लोक आहेत जे त्यांचे स्मरण करताना दिसतात.निवेदिता सराफ पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाल्या आहेत. कलर्स मराठी वरील त्यांची 'भाग्य दिले तू मला' ही मालिका सध्या टॉप रॅंकवर आहे. तर मराठी ओटीटी वरही त्यांनी 'अथांग' या वेबसिरीजमधून वेगळ्या भूमिकेत सगळ्यांना थक्क करून सोडलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने