'गुड फ्रायडे' च्या शुभेच्छा देऊन फसला माधुरीचा नवरा...नेटकऱ्यांनी भरवली शाळा

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित अनेकदा चर्चेत असते. नुकतिच ती अंबानी यांच्या कार्यक्रमात दिसली. तिथे तिने तिच्या सौदर्यांची जादू पसरवली. मात्र आता माधुरी ही तिच्या नवऱ्यामुळे चर्चेत आली आहे.पण यावेळी अभिनेत्रीचे भारतीय-अमेरिकन कार्डियोवस्कुलर सर्जन पती डॉ. श्रीराम हे देखील चर्चेत आले. त्याच झालं असं की श्रीराम नेने यांनी गुड फ्रायडे वर एक ट्विट शेअर केले, जे पाहून नेटिझन्सनी माधुरी दीक्षितच्या नवऱ्याला प्रचंड ट्रोल केलं आहे.



माधुरी दीक्षितचे डॉक्टर पती श्रीराम नेने यांनी शुक्रवारी ट्विट केलं आणि त्यामध्ये लिहिले, 'हॅपी अँड गुड फ्रायडे...ज्यांनी तो साजरा केला त्यांच्यासाठी.' हे पाहून नेटकरी संतापले आणि सोशल मीडिया यूजर्सने श्रीराम नेने यांना चांगलच धारेवर धरलं.त्यांना ट्रोल करण्यामागे कारणही तसचं होतं, ख्रिश्चनांसाठी 'गुड फ्रायडे'चे वेगळे महत्त्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या दिवशी ख्रिस्ताला क्रुसावर खिळण्यात आले.म्हणूनच 'गुड फ्रायडे'च्या दिवशी त्यांचं स्मरण करत शोक व्यक्त करण्यात येतो. त्याचवेळी नेनेच्या चुकीमुळे तिला ट्रोल्सच्या निशाण्यावर आणले आहे.श्रीराम नेने यांनी या दिवशी हॅपी फ्रायडे लिहिले, आणि गूड फ्रायडेच्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

श्रीराम नेने यांच्या ट्विटला उत्तर देताना एका यूजरने लिहिले की, 'सर गुड फ्रायडे कोण साजरा करतात? हा आशीर्वाद मागण्याचा दिवस आहे.उत्सव नाही.दुसऱ्याने लिहिले, 'ट्विट करण्यापूर्वी तुम्ही काही माहिती गोळा करायला हवी होती.' तर दुसरा लिहितो, 'सर, तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते.'श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांचा विवाह 1999 मध्ये झाला होता. यानंतर माधुरी अमेरिकेला गेली. दशकाहून अधिक काळ घालवून ती मुंबईत परतली.या जोडप्याला दोन मुलगे आहेत. माधुरी आणि नेने त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने