एकनाथ शिंदेंची नवी खेळी; शिवसेनेच्या प्रचारासाठी बनवणार नवी रणनिती

मुंबई: राज्यात सत्तासंघर्ष झाला. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर शिंदे समर्थक आमदार आणि भाजप यांनी मिळून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं. या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेना पक्ष आता अधिकृतरित्या शिंदे गटाचा झाला आहे.अशातच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. न्यायालयाने अंतिम निकाल राखून ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पक्षाच्या प्रचारासाठी जोरदार हालाचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या प्रचारासाठी नवी रणनिती आखली जात आहे.



इतकेच नव्हे तर शिवसेनेचा प्रचार करण्यासाठी नवी रणनिती काय असावी? हे ठरवण्यासाठी एका सल्लागार समितीची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्याकडे या सल्लागार समितीची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. नव्या शिवसेनेच्या प्रचारासाठी ही समिती नेमण्यात आली आहे.पक्षाची नवी रणनिती काय असावी? हे ठरवण्यासाठी एका सल्लागार समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांच्याकडे या सल्लागार समितीची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने