अटल बिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदी; भाजप कसा बनला देशात शक्तिमान

दिल्ली: आज भाजपचा स्थापना दिवस. 6 एप्रिल 1980मध्ये भारतीय जनता पार्टीने भारताच्या राजकारणात आपलं पहिलं पाऊल ठेवलं होतं. आज भाजप देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे आणि सदस्याचा विचार केला तर जगातील दुसरा मोठा पक्ष आहे. दोन सीटांपासून सुरू झालेल्या या पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणूकीच 303 सीटांवर आपला विजय मिळवला. 

श्‍यामा प्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्‍याय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (RSS) चा प्रमुख राजकीय दल भारतीय जनता पार्टीचा इतिहास पक्षाच्या नावा आणि चिन्हापेक्षाही जुना आहे. या मोठ्या पार्टीची सुरवात फक्त दोन लोकांपासून झाली होती.श्यामा प्रसाद मुखर्जी हे एक भारतीय राजकीय तज्ञ, बॅरिस्टर होते ज्यांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले होते. पुढे जम्मू-काश्मीरच्या मतभेदावरुन त्यांच्यात आणि नेहरूमध्ये मतभेद वाढले ज्यामुळे त्यांनी कांग्रेस पार्टीला राजीनामा दिला आणि जनसंघ पक्षाची याची स्थापना केली. हीच जनसंघ पुढे जाऊन भारतीय जनता पार्टी बनली.



1951 च्या निवडणूकीवेळी जनसंघ पक्षाचे निवडणूक चिह्न हे दीपक होते. श्‍यामा प्रसाद मुखर्जी आणि सामाजिक कार्यकर्ते दीनदयाल उपाध्‍याय या दोघांच्या जोडीने ही पार्टी उभी राहली. या दरम्यान अटल बिहारी वाजपेयी आणि लाल कृष्ण आडवाणी यांनी पक्षाला देशभरात पोहचवण्याचं काम केलं. 1952 च्या निवडणूकीच्या वेळी जनसंघ पार्टी अपयशी ठरली. त्यांच्या पार्टीला फक्त ३ सीट्स मिळाली.दिवसामागून दिवसं जात होते आणि देशाच्या राजकारणात अनेक बदल दिसत होते. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर कांग्रेस हा एक असा राजकीय पक्ष होता ज्याची संपुर्ण देशात चर्चा सुरू होती. नेहरू नंतर कांग्रेसचा धुरा इंदिरा गांधींनी सांभाळला.1975 मध्ये इंदीरा गांधींनी आणीबाणीच्या घोषणा केल्यानंतर लोकांच्या मनात आक्रोश पसरला होता. लोकांना कांग्रेसच्या जागी एक ऑप्शनल पक्ष हवा होता. आणि त्याच वेळी समाजसेवी जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनावरुन एक नव्या राष्ट्रीय दलाची म्हणजेच ‘जनता पार्टी’ चे गठन करण्यात आले.या दरम्यान जनसंघ पार्टीलाच जनता पार्टी बनविण्याची मागणी जोरदार सुरू झाली. जनता पार्टीसोबत अनेक लहान मोठे राजकीय दल आले. या दरम्यान भारतीय जनसंघचे निवडणूक चिन्ह 'दीपक' बदलून जनता पार्टीचे निवडणूक चिन्ह 'हलधर किसान' मध्ये बदलण्यात आले.

जनता पार्टी त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी झाली. जनतेने इंदिरा गांधी यांच्या जागी जनता पार्टीवर विश्वास ठेवला आणि मोरारजी देसाई हे देशाचे नवीन पंतप्रधान झाले. त्यानंतर जनता पार्टी आणि भारतीय जनसंघांच्या नेत्यांमध्ये आपसी वाद वाढल्याच्या बातम्या समोर आल्या.त्यानंतर जनता पार्टीतील नेत्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना नवीन राजकीय पक्ष उभारणे गरजेचे होते. त्यामुळे 6 एप्रिल 1980 ला मुंबईमध्ये एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आणि पार्टीचे नाव भारतीय जनता पक्ष ठेवण्यात आले. अशा प्रकारे देशात भाजप उदयास आला. त्यावेळी अटल आणि आडवाणी हे भाजपचे दोन प्रमुख चेहरे होते.1984 मध्ये देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्याच वर्षी निवडणूक लढवण्यात आली ज्यामध्ये भाजपच्या फक्त दोन जागा आल्या. त्यानंतर 1986 मध्ये लालकृष्ण आडवाणी यांना पार्टीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.आडवाणी यांनी त्यावेळी राममंदिराचा मुद्दा घेऊन देशात क्रांती घडविण्याचा प्रयत्न केला आणि याच्याच जोरावर 1989 मध्ये भाजपने 86 जागा जिंकल्या.


त्यानंतर भाजपने कधीच मागे वळून पाहिले नाही. 1991 च्या लोकसभा निवडणूकीत पार्टीने 120 सीटा जिंकल्या तर 1996 मध्ये हा आकडा 161 पर्यंत पोहचला. मात्र त्यावेळी भाजप कडे सरकार बनविण्याचं संख्याबळ नव्हतं मात्र अन्य पक्षांच्या समर्थनावर अटल बिहारी वाजपेयी यांना देशाचे पंतप्रधान बनविण्यात आले. मात्र अन्य पार्ट्यांचे समर्थन न मिळाल्याने हे सरकार फक्त 13 दिवस चालले.याशिवाय1998 मध्ये भाजपने लोकसभा निवडणूकीत 182 जागा जिंकल्या. त्यानंतर गठबंधन करुन सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान बनविण्यात आले. हे सरकार 13 महिने चालले. त्यानंतर 1999 मध्ये झालेल्या निवडणूकीत बीजेपी ला 182 सीट्स मिळाल्या त्यावेळी मात्र भाजपने अन्य सहकारी दलांसोबत मिळून 5 वर्ष सरकार चालवले.त्यानंतर मात्र 2004 आणि 2009 च्या निवडणूकीत भाजपला सातत्याने अपयश आले. 2009 च्या निवडणूकीनंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांचा 'गुजरात मॉडल' संपुर्ण देशात चर्चेचा विषय होता.

 गुजरातच्या राजकारणातून बाहेर पडून नरेन्द्र मोदी  केन्द्राच्या राजकारणात आले आणि 'अच्छे दिन' चा नारा देश लोकांचा विश्वास जिंकला त्याचाच परिणाम 2014 च्या निवडणूकीत दिसून आला आणि पंतप्रधानासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा समोर ठेवून भाजपने पुन्हा सत्ता काबीज केली.2014 मध्ये 282 सीट्स भाजपच्या आल्या आणि काँग्रेसनी सत्ता गमावली. पुढे 2019 च्या निवडणूकीतही जनतेने भाजपलाच निवडून आणले. 303 च्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेत आलं आणि दुसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले.जवळपास 43 वर्षानंतर भाजप, देशातील सर्वात मोठा पक्ष बनलाय. यासाठी भाजपला अनेकदा अपयशही बघावे लागले पण वेळेसोबत भाजपने आणि राजकीय खेळी नेहमीच बदलली त्यामुळेच आज भाजप सत्तेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने