2024च्या निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

नवी दिल्ली : भाजपला हारवायचं असेल तर विरोधकांची एकजूट हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं बोललं जात आहे. पण विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्यानं अद्यापही या एकजुटीबाबत संभ्रमावस्था आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी यावर भाष्य केलं आहे.पवार म्हणाले, "दहा दिवसांपूर्वी सर्व विरोधीपक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आम्ही सर्व प्रकारच्या समस्यांवर चर्चा केली. यामध्ये असे काही मुद्दे आहेत त्यावर सर्वजणांचं एकमत होत नाहीए त्यावरही आम्ही एकत्रितपणे चर्चा केली"



दरम्यान, काँग्रेसनं भाजपला घेरण्यासाठी अदानींविरोधातील हिंडेनबर्गचा मुद्दा लावून धरला आहे. अधिवेशनादरम्यान लोकसभा बंद पाडण्यापर्यंत हा मुद्दा तापला होता. पण कालच शरद पवार यांनी याप्रकणावर पहिल्यांदा भाष्य करताना काँग्रेसनं लावून धरलेली जेपीसीची अर्थात जॉईन्ट पार्लमेंटरी कमिटीच्या चौकशीऐवजी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशीची मागणी केली. त्यामुळं पवारांवर अनेकांनी टीकाही केली आहे.विरोधकांमध्ये एकवाक्यता नसल्यानं भाजपला हारवणं त्यांना कसं शक्य होणार? अशा चर्चा देखील शरद पवारांच्या या विधानाच्या निमित्तानं सुरु झाल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने