विधानसभा निवडणुकीत लिंगायत ठरणार 'किंगमेकर'; मुस्लिम, ख्रिश्चनांचं मतदान किती?

कर्नाटक: कर्नाटकात महिनाभरानंतर निवडणुका होणार आहेत, त्यासाठी भारतीय जनता पक्ष काँग्रेस  आणि जनता दल (सेक्युलर) यांनी जोरदार तयारी सुरू केलीये.राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. सध्या 84 टक्के हिंदू लोकसंख्या असलेल्या कर्नाटकात भाजपची सत्ता आहे. मात्र, यावेळी काँग्रेस आणि जेडीएसनं  पूर्ण ताकद लावली आहे.स्वत: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकातील विविध भागांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. वास्तविक, कर्नाटकात असे अनेक भाग आहेत, जे सर्व पक्षांसाठी निवडणुकीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहेत. कित्तूर कर्नाटक प्रदेश यापैकीच एक आहे.



कित्तूर मतदारसंघ हा लिंगायतबहुल क्षेत्र आहे. येथून 50 आमदार निवडून येतात. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही येथूनच निवडून येतात, त्यामुळंच प्रत्येक विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ किंगमेकरच्या भूमिकेत असतो. या प्रदेशात बागलकोट, धारवाड, विजयपुरा, बेळगांव, हावेरी, गदग आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथं भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. त्याचबरोबर जेडीएसची स्थिती कमकुवत असल्याचं बोललं जात आहे.

मतदारसंघात 17 टक्के 'लिंगायत'

गेल्या विधानसभा निवडणुकीत या भागातील एकूण 50 जागांपैकी 30 जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेसला 17 तर जेडीएसला दोन जागा मिळाल्या. कर्नाटकातील एकूण लोकसंख्येपैकी 12.9 टक्के मुस्लिम, तर 1.87 टक्के ख्रिश्चन आहेत. मात्र, एकूण लोकसंख्येपैकी 17 टक्के लोकसंख्या ही लिंगायत समाजाची आहे. त्यामुळंच या समाजाचा पाठिंबा ज्या पक्षाला मिळतो, त्याच पक्षाचं सरकार बनतं असं बोललं जातं.

लिंगायत समाजानं काँग्रेसचा 'हात' सोडला

लिंगायत व्होट बँक एकेकाळी काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव गांधी यांनी लिंगायत समाजातील माजी मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील यांच्यावर पक्षाघाताचा आरोप करत पदावरुन हटवलं. तेव्हापासून लिंगायत समाजानं काँग्रेसचा 'हात' सोडला आणि त्याचवेळी ही मतं भाजपकडं वळली.

लिंगायत मतं पुन्हा भाजपकडं वळली

लिंगायत समाजातून आलेल्या बीएस येडियुरप्पा  यांनी भाजपशी फारकत घेतल्यानंतर, या समाजानंही भाजपकडं पाठ फिरवली आणि 2013 च्या निवडणुकीत काँग्रेसनं शानदार पुनरागमन केलं. या प्रदेशात काँग्रेसनं 50 पैकी 31 जागा जिंकल्या. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी येडियुरप्पा पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळं लिंगायत मतं पुन्हा एकदा भाजपकडं गेली. सध्या 224 जागा असलेल्या राज्यात काँग्रेसचे 70 आमदार, तर जेडीएसकडं 30 आमदार आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी भाजपचे 121 आमदार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने