हनुमान जयंतीनिमीत्त केंद्र सरकारचे राज्यांना महत्वाचे निर्देश

दिल्ली: गृह मंत्रालयाने हनुमान जयंती निमीत्तर राज्य सरकारांसाठी एक अडव्हायजरी जारी केली आहे. या अंतर्गत राज्य सरकारांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे तसेच हनुमान जयंती निमीत्त धार्मिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. उद्या म्हणजेच ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने हनुमान जयंतीच्या तयारीसाठी सर्व राज्यांना एक एडव्हायजरी जारी केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, सण शांततेत साजरा करणे आणि समाजातील जातीय सलोखा बिघडवणार्‍या कोणत्याही घटकांवर लक्ष ठेवणे यासाठी राज्य सरकारांना निर्देष देण्यात आले आहेत.



देशभरातीव वेगवेगळ्या ठिकाणी राम नवमीच्या दिवशी हिंसा झाल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील काही भागांचा समावेश होता. यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. यापूर्वीच सर्व राज्यांना सणांदरम्यान परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत.रामनवमी दिवशी सुरू झालेली जातीय हिंसाचार अद्यापही थांबलेली नाहीये, याचा सर्वाधिक परिणाम हा पश्चिम बंगालच्या हुगळी येथे पाहायला मिळाला. आता देखील पश्चिम बंदास आणि बिहारच्या काही शहरांमध्ये हिंसाचार भडकण्याचे प्रकार समोर येत आहेत.

या पार्श्वभूमिवर कलकत्ता हायकोर्टाने हनुमान जयंती निमीत्त बुधवार (५ एप्रिल) रोजी आदेश दिला आहे. हायकोर्टाने बंगाल सरकारला केंद्राकडून फोर्स मागवून घ्या. राज्य पोलीस पुरे नसतील तर पॅरामिलेटरी फोर्सची मदत घेऊ शकता. आपल्याला नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे असे म्हटले आहे.तसेच दिल्ली मध्ये देखील हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी दिल्ली पोलीसांनी देखील जहांगीरपुरी येथे फ्लॅग मार्च काढला. पोलिसांनी ६ एप्रिल रोजी हनुमान जयंती निमीत्त जहांगीरपुरी भागात मिरवणूक काढण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि एक दुसऱ्या गटाला परवानगी नाकारली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने