औद्योगिक क्षेत्राला मिळावे पाठबळ

मुंबई:  काही स्त्रिया जन्मत:च उद्योगिनी असतात. कारण, त्यांच्या घरातील पिढ्यान्‌पिढ्या चालणाऱ्या व्यवसायामुळे त्यांना व्यवसायाचे बाळकडू मिळालेले असते. काही महिलांवर उद्योगाची जबाबदारी लादली जाते,ती वडील, पती किंवा भावाच्या आजारपणामुळे किंवा अकाली निधनामुळे, तर काही महिला स्वत: प्रयत्नपूर्वक उद्योजिकेचे गुण विकसित करतात. बेळगावात काही मोजक्याच उद्योजिका आहेत. त्यांनी आपल्या खांद्यावर ही जबाबदारी पेलली आहे.

येथील नऊ औद्योगिक वसाहतीतही मोठ्या प्रमाणात महिला कामगार आहेत. त्यातील काही शिक्षित तर काही अशिक्षित असल्या तरी आपल्या कुटुंबाचा गाढा चालविण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. औद्योगिक वसाहतीत कामाला असणाऱ्या महिलांना काही समस्याही भेडसावत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.बेळगावात नऊ औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये महिला उद्योजिका कमी असल्या तरी महिला कामगारांची संख्या मोठी आहे. सध्याच्या महिला शिक्षित आहेत. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची माहिती आहे.



त्यामुळे या महिला वेगवेगळी संधी शोधत असतात. महिलांनी उद्योगधंद्यामध्ये यावे यासाठी सरकारकडून सबसिडीमध्ये जास्त प्राधान्य दिले जात आहे. स्वतःचा उद्योग सुरु करावा,हा त्यातील मूळ उद्देश आहे. तरीही बेळगावात अनेक महिला उद्योगधंद्यात येत नाहीत. क्वचितच महिला उद्योगधंद्यात येतात. उद्योग क्षेत्र चांगले आहे. महिलांनीही धाडस करून निर्णय घेणे आवश्‍यक आहे. सरकारकडून उद्योगधंद्यात पुरुषांपेक्षा ५ टक्के अधिक सबसिडी दिली जाते. तसेच बँकेमधूनही कर्ज अधिक मिळते.

उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत महिला कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. शक्यतो प्रत्येक कंपनीत या कामगार दिसतात. काही कपन्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिला कामगारांचा भरणा आहे.बेळगावची औद्योगिक वसाहत २४ तास चालते. रात्रीच्या वेळी पुरुष कामगार कामावर असतात. मात्र, सायंकाळी ६ ते सात वाजेपर्यंत महिला कामगारांना त्या ठिकाणी थांबावे लागते.अशातच स्वच्छतागृह औद्योगिक वसाहतीत नसल्यामुळे महिलांतून नाराजी दिसून येते. त्यामुळे राज्य सरकारने औद्योगिक वसाहतीत जास्तीत जास्त ठिकाणी स्वच्छतागृह उभारावे,

अशी महिलांतून केली जात आहे. अनेक महिला कामगार औद्योगिक वसाहतीतून सायंकाळी घरी जातात. मात्र, औद्योगिक वसाहतीतील अनेक ठिकाणचे पथदीप बंद आहेत. त्यामुळे त्यांना ये-जा करताना धोका पत्करावा लागतो. औद्योगिक वसाहतीतील बंद असलेले पथदीप सुरु केल्यास महिलांनाही सायंकाळी काम संपल्यांतर घरी जाण्यास सोयीस्कर होईल.औद्योगिक वसाहतीत पुरुष उद्योजकांचा अनेक संघटना आहेत. त्यांच्यामार्फत सरकार दरबारी आपल्या समस्या पोहचविल्या जातात. त्या सोडविण्यासाठीही हालचाली होतात. मात्र, महिलांच्या काही मोजक्याच संघटना आहेत. महिलांसाठी असलेल्या संघटनांनी तसेच अजून काही संघटना निर्माण करुन महिला कामगार व उद्योजकांचे प्रश्‍न सरकारदरबारी पोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने