यशस्वी होण्यासाठी ज्ञान आणि ज्ञानासाठी 'या' गोष्टी आवश्यक, भगवत् गीता सांगते...

मुंबई: कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्या विषयातलं ज्ञान घेणं फार आवश्यक असतं. आणि ज्ञान मिळवण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. काही गोष्टी स्वीकारणे तर काही गोष्टी सोडणे गरजेचं असतं. हे गुण अर्जूनात होते म्हणूनच त्याला श्रीकृष्णाने गीता सांगितली.याविषयी श्रीकृष्ण म्हणाले, हे अनसूयु अर्जुना, तुला मी आता गुह्यातील गुह्य असलेले विज्ञानासहित ज्ञान सांगतो ते जाणल्यावर तू पापांपासून मुक्त होशील.कर्मयोगाचे आचरण करत असताना मुक्त अवस्था कशी प्राप्त होऊ शकते ते श्रीकृष्णाने समजावून सांगितले. मागील दोन तीन अध्यायांमध्ये सांगितलेली साधना अतिशय कठीण होती हे आपल्याला जाणवते. इंद्रियनिग्रह, निष्काम निरासक्त आचरण, प्राणायाम, ध्यान समाधी यासारख्या योगातील क्रिया हे सर्व नुसते ऐकूनसुद्धा घाबरून जायला होते.

पण आता श्रीकृष्ण जे सांगणार आहे ते साधन सुखद आणि सोपे आहे. अर्जुनामधील सद्‍गुण श्रीकृष्णाला नेहमीच आवडत असत. आणि संतुष्ट होऊन तो त्याला उपदेश करत असे.नवव्या अध्यायात सुरुवातीलाच अर्जुनाला ‘अनसूयु’ असे अतिशय कौतुकाने संबोधतो.असूया हा एक दुर्गुण आहे. ‘गुणेषु दोषाविष्कारणम् असूया’ अशी त्याची व्याख्या आहे. एखाद्याच्या चांगल्या गुणांवर दोषाचा आरोप करणं म्हणजे असूया. अर्जुन असूयेपासून मुक्त होता. श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना तुझ्यात दोषदर्शिता नाही म्हणूनच तू हे गुह्यतम ज्ञान मिळवण्यास पात्र आहेस. हीच राजविद्या म्हणजे श्रेष्ठविद्या आहे. ती रहस्यमय आहे.



अतिशय पवित्र आणि उत्तम आहे आणि प्रत्यक्ष अनुभवास येण्यासारखी सुखकर अव्यय आणि आचारधर्मास अनुसरूनच आहे. ही विद्या अविनाशी फळ देणारी आहे. ज्यांच्या अंतकरणात या ज्ञानावर श्रद्धा नसते त्यांना ईश्वराची प्राप्ती होत नाही आणि ते जन्ममृत्यूरूपी संसारात येरझारा घालत राहतात. आता ही विद्या अत्यंत गुप्त आहे. असे का म्हणतात ते पाहू.उपनिषदांमध्ये मोक्षप्राप्तीच्या साधनांना विद्या असे म्हणतात अविवेकी दुर्गुणी स्वार्थी मनुष्याच्या हाती पडू नये म्हणून गुप्त ठेवली जात असे. म्हणून तिला राजगुह्य असे म्हटले जाते. दुसरे म्हणजे ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही एकमेकांत अतिशय मिसळलेले असतात त्यामुळे त्यांना वेगवेगळे करणे कठीण असते. तांदळातील खडे वेगळे काढणे सोपे असते पण दूध आणि पाणी कसे वेगळे करणार? तसेच ब्रह्म-माया, ज्ञान आणि विज्ञान यातील भेद समजणे खूप कठीण असते. ज्ञानी गुरूंकडूनच ते समजून घ्यावे लागते. म्हणूनच या विद्येला गुप्त किंवा झाकलेली विद्या असे म्हटले आहे.

अर्जुन सद्‍गुणांनी संपन्न आणि विवेकी आहे याची निश्चिती झाल्यामुळेच व्यक्त परमेश्वराची उपासना म्हणजेच भक्तीमार्गाचा उपदेश आता श्रीकृष्ण करणार आहे.उपनिषदांमध्ये मोक्षप्राप्तीच्या साधनांना विद्या असे म्हणतात अविवेकी दुर्गुणी स्वार्थी मनुष्याच्या हाती पडू नये म्हणून गुप्त ठेवली जात असे. म्हणून तिला राजगुह्य असे म्हटले जाते. दुसरे म्हणजे ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही एकमेकांत अतिशय मिसळलेले असतात त्यामुळे त्यांना वेगवेगळे करणे कठीण असते. तांदळातील खडे वेगळे काढणे सोपे असते पण दूध आणि पाणी कसे वेगळे करणार? तसेच ब्रह्म-माया, ज्ञान आणि विज्ञान यातील भेद समजणे खूप कठीण असते. ज्ञानी गुरूंकडूनच ते समजून घ्यावे लागते. म्हणूनच या विद्येला गुप्त किंवा झाकलेली विद्या असे म्हटले आहे.अर्जुन सद्‍गुणांनी संपन्न आणि विवेकी आहे याची निश्चिती झाल्यामुळेच व्यक्त परमेश्वराची उपासना म्हणजेच भक्तीमार्गाचा उपदेश आता श्रीकृष्ण करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने