केसगळती थांबवायचीय, दाट केस हवेत तर या गोष्टींचा आहारात करा समावेश

मुंबई: दाट केस हवेत असं प्रत्येकालाच वाटत. मग त्या स्त्रिया असोत वा पुरुष. अलिकडे धकाधकीचं जीवन, वाढता ताण, वाढतं प्रदूषण, आंघोळीसाठी वापरात येणारं दूषित तसचं क्लोरीनचं पाणी यामुळे केस गळण्याची  समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालीय. एवढचं काय तर केस गळण्यासोबतच ते कुमकुवत झाल्याने केस तुटणे आणि अकाली केस पांढरे होणे  या समस्यांनी देखील अनेक जण त्रासले आहेत. केस धुण्यासाठी वापरत असलेल्या शॅम्पूमधील केमिकल्समुळेही केसांवर वाईट परिणाम होतात. 

केस गळती थांबवी किंवा घनदाट, काळ्याभोर आणि चमकदार केसांसाठी बरेचजण वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकांच्या शॅम्पूंची ट्रायल घेतली जाते. तर कधी बाजारातील वेगवेगळी औषधी तेलं वापरली जातात. अनेक जण घरगुती तेल किंवा हेअर मास्कचाही वापर करतात. यामुळे काहीवेळेस फरक पडतो. मात्र हे सर्व उपाय करूनही जर तुमची केस गळती थांबत नसेल तर तुमच्या केसांना बाह्य पोषण नव्हे तर आतून म्हणजेच शरिरातून पोषण मिळणं गरजेचं आहे.आज आम्ही तुम्हाला केसांची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टींचं सेवन फायदेशीर ठरतं हे सांगणार आहोत. तुमच्या आहारात जर या पोषक पदार्थांचा समावेश केलात तर तुम्हाला केसांची चिंता करण्याची आवश्यकता भासणार नाही.



कडीपत्ता: आपल्या रोजच्या जेवणाची रुची वाढवणारा कडीपत्ता तुमच्या केसांसाठी देखील खुपच फायदेशीर आहे. कडीपत्त्यामध्ये विटामिन, आयरन आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याने केसांचं आरोग्य चांगलं राहतं. कडीपत्ता नियमित सेवन केल्याने केस गळती थांबून तुमचे केस दाट होतील. जेवणात कडीपत्ता वापरला जातोच मात्र तुम्ही सकाळी काही कडीपत्त्याची पान चावून खाऊ शकता. तसचं तुमच्या डाएटमध्ये कडीपत्ता शेक ट्राय करू शकता. या व्यतिरिक्त आणखी काही वनस्पती, भाज्या आणि औषधी फळं आहेत, ज्यांचा वापर करुन तुम्ही थांबवून शकता केसगळती...काय आहेत ते पुढे वाचा.....

 शेंगदाणे- शेंगदाणा हे बायोटिनचा एक उत्तम स्त्रोत आहेत जे केस वाढीस मदत करत. त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं विटामिन-बी आणि फालेट यांचं प्रमाण शेंगदाण्यामध्ये अधिक असतं. त्याचप्रमाणे शेंगदाण्यामध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळेही केस चांगले राहतात. दररोज रात्रभर भिजवलेले मुठभर शेंगदाणे चावून खाल्याने केस तंदूरुस्त होण्यास मदत होईल.

आवळा- केसांच्या वाढीसाठी विटामिन सी जास्त गरजेचं असतं. आवळ्यामध्ये विटामिन-सीचं प्रमाण अधिक असतं. त्यासोबतच फायबर, आयरन, फॉलेट, ओमेगा ३ , मॅग्नेशियम आणि कॅलशियम सारख पोषक तत्व आवळ्यामध्ये आढळतात. यामुळे केस मुळापासून मजबूत होण्यास मदत होते. तसचं कमी वयातच केस पांढरे होणं टाळायचं असेल तर तुमच्या आहारात आवळाचा नक्की समावेश करा. आवळ्याचा मुरंबा, चटणी तसचं चूर्ण तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे आवळा ज्युसही केसांसाठी फायदेशीर आहे. 

आंबट फळे-  आंबट फळांमध्येही विटामिन-सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. स्कॅल्पला म्हणजेच केसांच्या मुळांना मजबुती देण्यासाठी आंबट फळं उपयुक्त ठरतात. यात तुम्ही संत्री, मोसंबी, लिंबू या सहज मिळणाऱ्या फळांचं सेवन करू शकता. त्यासोबतच किवी, बेरीज आणि पपई हे देखील खाणं फायदेशीर ठरेल.

त्रिफळा- त्रिफळा हे केसांसाठी एक उत्तम औषध आहे. यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले अँटीऑक्सिडन्ट घटक केस वाढीसाठी मदत करत. रोजच्या आहारात तुम्ही त्रिफळा चहा समाविष्ट करू शकता. त्रिफळा उष्ण गुणधर्माचं असल्याने केवळ दिवसातून एकदाच या चहाचं सेवन करावं. 

गाजर- गाजर हे केस वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. गाजर हे विटामिन-एचा समृद्ध स्त्रोस असल्याने याचे केसांसाठी असंख्य फायदे आहेत. शरीराचील सेल्स म्हणजेच पेशींच्या वाढीसाठी विटामिन-ए गरजेचं असतं. त्यामुळे अर्थातच गाजराच्या सेवनामुळे केस वाढीस मदत होते. एवढचं नव्हे तर गाजर खाल्ल्याने केस दाट, चमकदार आणि सॉफ्टदेखील होतात. तुम्ही गाजर स्मूदी, गाजर हलवा, लोणचं किंवा सलाडमध्ये देखील खाऊ शकता. 

पालक- पालकमध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असतं. शरीरात आयरनची कमतरता निर्माण झाल्याने केस गळणं सुरु होतं. खास करून महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान आयरनची कमतरता निर्माण होते परिणामी केस गळतात. यासाठीच आहाराच पालकचा समावेश करणं कधीही उत्तम. 

सुकामेवा-  केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारं ओमेगा-३ फॅटी अॅसिड ड्राय फ्रूटमध्ये आढळतं. त्यामुळे बदाम आणि अक्रोड यांचा तुम्ही आहारात समावेश करा. यासोबतच अळशीच्या बिया देखील केसांचा पोत सुधारण्यास मदत करतात. उत्तम आरोग्यासाठी बाह्य उपायांपेक्षा शरीराला आतून पोषण देणं गरजेचं असतं. म्हणजे पोषक आहार हा सर्व समस्यांवरील उपाय आहे हे लक्षात घेणं गरजेच आहे. मग ते तुमचे सांधे असो, त्वचा किंवा केस बाह्य उपाय म्हणजेच विविध लेप किंवा मास्क यांपेक्षा पोषण आहार घेतल्यास सर्व तक्रारी दूर होतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने