जिंकल्यानंतर अयोध्येच्या ऋषी सिंहची हवा! थेट मुख्यमंत्री योगींनीच शेअर केली पोस्ट..

उत्तर प्रदेश: टेलिव्हिजन सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलचा सीझन 13 वा सिझन चांगलाच गाजला. या शोला प्रेक्षकांनी भरपुर प्रेम दिलं.काल या सिझनचा अंतिम सामना मोठ्या उत्साहात पार पडला. अयोध्येतील रहिवासी ऋषी सिंगने जिंकला आहे.इंडियन आयडॉलचा 13 वा सीझन सुमारे सात महिने चालला आणि शेवटी 6 अंतिम स्पर्धकांमधून ऋषी सिंगला विजेता म्हणून निवडण्यात आले.विजेता झाल्यानंतर ऋषीवर सर्वच स्तरावरुन आंनदाचा वर्षाव होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ऋषीचे विजेते झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.



मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर ऋषीच अभिनंदन करत ट्विट केलं आहे. सीएम योगी म्हणाले की, 'इंडियन आयडॉल-१३' चे विजेते झाल्याबद्दल अयोध्याचा रहिवासी ऋषी सिंह याचे हार्दिक अभिनंदन! उत्तर प्रदेशसह संपूर्ण संगीत जगताला तुमच्या अतूट संगीत अभ्यासाला समर्पित केलेल्या या यशाचा अभिमान आहे. माता सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर राहो, तुमची यशाची सुवर्णलक्षा अखंड चालू राहो, हीच माझी सदिच्छा'इंडियन आयडॉल बनल्याबद्दल ऋषी सिंगला २५ लाखांचा धनादेश मिळाला. याशिवाय त्याला कार आणि टायटल ट्रॉफीही मिळाली आहे.

याशिवाय त्याला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा कॉन्ट्रॅक्टही मिळाला आहे. या सीझनच्या सुरुवातीपासूनच ऋषी जजचा आणि प्रेक्षकांचा आवडता बनला होता. त्याने आपल्या आवाजाने सर्वांना वेड लावले होते.ऋषी सिंह हा मूळचा उत्तर प्रदेश येथील अयोध्येचा रहिवासी आहे. त्याला लहानपणापासूनच गाणी गाण्याची व लिहिण्याची आवड आहे.महत्त्वाची बाब म्हणजे ऋषी सिंह त्याच्या आई-वडिलांचा खरा मुलगा नाही, त्यांनी त्याला दत्तक घेतलं होतं, याचा खुलासा खुद्द ऋषीनेच शोमध्ये केला होता.तो सध्या डेहराडूनमधील हिमगिरी जी विद्यापीठातून त्याचं शिक्षण पूर्ण करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने