मविआच्या सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची! चर्चेवर अजित पवारांचं

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील मविआच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यामुळं राज्याच्या राजकारणात भलतीच चर्चा रंगली होती, माध्यमांनी देखील याबाबत बातम्या चालवल्या. पण आता या चर्चेवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.अजित पवार म्हणाले, "महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेला सर्वजण उपस्थित असतील असं नाही, सभेसाठी तसं धोरणं स्विकारण्यात आलं आहे. त्यानुसार दोन तासात सभा संपावी यासाठी प्रत्येक पक्षाचे साधारण दोनच नेते बोलतील, असंही यात ठरलंय. आमच्या प्रत्येक पक्षात अनेक मान्यवर आणि वडीलधारे आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी सभा उरकली आणि आज स्वतः राहुल गांधी सूरतला येणार होते म्हणून ते लगेच निघाले, त्यामुळं त्यांच्या जाण्याला वेगळं वळण देण्याची गरज नाही.



उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची!

दरम्यान, गेल्या काळात उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळं आजही ते ताठ बसता येईल अशी खुर्ची वापरतात. त्यामुळं सभेच्या ठिकाणी देखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. बाजूला दोघांसाठी सोफ्याच्या खुर्च्या ठेवल्या होत्या, त्यामुळं यामध्ये खुर्चीबाबत भेदभाव केलेला नाही, याची नोंद घेण्यात यावी, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी या वादावर दिलं आहे.

'रिक्षावाला सीएम' वादावरही दिलं स्पष्टीकरण

"आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं एकोप्यानं या गोष्टीला समोर जात आहोत. वज्रमूठमागची आमची भूमिका पण तीच आहे. खासदार अरविंद सावंत यांनी सरकार स्थापन करत असताना शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करुन सीएमपदासाठी शिंदे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. पण त्यांनी हे स्पष्ट केलं की, रिक्षावाला हा शब्द माझा होता शरद पवारांचा नाही. मी पवारांचं नाव घेतलं पण उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मला एका शिसैनिकाला सीएम करायचं होतं, असंही सावंत यांनी स्पष्ट केल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने