अखिल भारतीय फिडे बुद्धिबळ स्पर्धा मुंबईत

मुंबई : अखिल भारतीय फिडे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मुंबईत करण्यात येणार आहे. पेडर रोड येथील रशियन सेंटर फॉर सायन्स आणि कल्चर येथे ही स्पर्धा ७ ते १२ एप्रिल यादरम्यान खेळवण्यात येणार आहे.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या अधिपत्याखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. 



स्वीस लीग पद्धतीने नऊ फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. तीन लाखांची बक्षिसे या स्पर्धेत दिली जाणार असून विजेत्यावर ७५ हजार रुपयांचा वर्षाव करण्यात येणार आहे. तसेच ७, ८, ९ व १० वर्षांखालील गटामध्ये अव्वल तीन क्रमांकावर येणाऱ्या स्पर्धकांना करंडकही देण्यात येणार आहेत.chessfee.com या पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९८२०५४७५४८/९८२०७२९८६७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन बुद्धिबळपटूंना करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने