शिवाजी महाराजांचा अपमान करणारे सुधांशू त्रिवेदी भाजपच्या गौरव यात्रेत, भाजप म्हणतं...

मुंबई:  राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचा अपमान केल्यामुळे भाजप राज्यात सावरकर गौरव यात्रा काढत आहे. यात्रेच्या माध्यमातून भाजप विरोधकांवर टीका करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार या यात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल करत आहेत. विरोधकांनी भाजपच्या यात्रेवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत तुकोबा आणि इतर थोर महापुरूषांचा अपमान झाला तेव्हा गौरव यात्रा का काढली नाही, असा सवाल विरोधक करत आहेत.काल नागपूर येथे झालेल्या गौरव यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे भाजप नेते सुधांशू त्रिवेदी व्यासपिठावर होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बावनकुळे एबीपी माझावर बोलत होते.




सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार?

याबाबत संजय राऊत राजकारण करतात. वीर सावरकरांना भारतरत्न मिळाणार तेव्हा यांना कळणार सुद्धा नाही. महात्मा फुले यांना देखील भारतरत्न मिळायला हवे. मात्र संजय राऊत यांना सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.

महाराष्ट्रातील महापुरषांचा अपमान झाला तेव्हा यात्रा का काढली नाही -

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानास्पद वक्तव्य केले होते. ते काल नागपुरात भाजपच्या व्यासपिठावर होते. यावर बोलताना बावनुळे म्हणाले, जे चुकले त्यांचे आम्ही समर्थन केले आहे. एखाद्यावेळी काही बोलताना मनुष्य चुकतो. पण वारंवार चुका करायच्या का?. तुम्ही सावरकरांवर नेहमी बोलता. कोणी चुकी केली असेल तर त्यानी माफी मागीवी, इतिहास वाचावा. मात्र वारंवार सावरकरांवर बोलणे योग्य नाही. राजकारण्यांनी महापुरुषांचे नाव घेऊ नये.

मग राज्यपाल तर वारंवार महापुरूषांचा अपमान करत होते -

राज्यपालांनी महापुरुषांवर वक्तव्ये केली तेव्हा भाजपने कोणतीही भूमिका मांडली नाही. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यपाल बोलतांनी चूक झाली होती. आम्ही स्पष्ट सांगितले होते की आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. कुणी त्यांचे समर्थन केले नाही. भाजप नेत्यांनी महापुरूषांचा अपमान केला तरी आम्ही त्याचे समर्थन करणार नाही.

राज्यपालांच्या विरोधात यात्रा का काढली नाही -

तुम्ही सावरकरांचा वारंवार, जाणीवपूर्वक अपमान करत आहात. एकवेळा आम्ही समजू शकतो. मात्र ते नेहमी अपमान करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने