'बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही' राष्ट्रवादीच्या नेत्यानं स्पष्टचं सांगितलं

मुंबई:  राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेतून बंड करत एकनाथ शिंदे ४० आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते. या बंडामध्ये प्रहार पक्षाचे आमदार आणि तत्कालीन मंत्री बंच्चू कडू यांची देखील महत्त्वाची भूमिका होती.शिंदे यांच्या सोबत जात नव्या सरकारमध्ये मंत्री पद मिळेल अशी अपेक्षा असलेले बच्चू कडू यांनी मंत्री पद मिळालं नाही म्हणून वेळोवेळी आपली नाराजगी बोलून दाखवली. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बच्चू कडू यांना आता मंत्रिपद मिळणार नाही असं म्हणत चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.



ते टीव्ही 9 शी बोलत असताना म्हणाले, "बच्चू कडू यांना आता मंत्रिपद मिळणार नाही, हे त्यांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला कळलंय" असं विधान केलं आहे. तर त्यांनी थेट गणितच समजावून सांगितलं.ते म्हणाले, शिंदे गटातील ४० आमदारांनाही मंत्रिपद हवंय. तसंच भाजपच्याही अनेक नेत्यांना मंत्रिपद पाहिजे.जर आपण पाहिलं तर पाच आमदाराच्या मागे एक मंत्रिपद येऊ शकतं. त्यामुळे शिंदे गटावा १२ किंवा १४ पर्यंत मंत्रिपदे मिळतील. तर बाकीच्या २६ लोकांना काय मिळणार? असं म्हणत त्यांनी बच्चू कडू यांना चिमटा काढला आहे.

'उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला पण अजित पवारांसोबत...'

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी खंत बोलून दाखवली ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद नाही तर मनभेद झालेत, त्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यामुळे त्यांच्या सोबत भाजप कधीही जाणार नाही, त्यांच्यासाठी भाजपची दारं सध्यातरी बंद आहेत. असं बावनकुळे म्हणाले. तर अजित पवारांवर बोलताना म्हणाले, अजित पवारांनी कधीही विश्वासघात केला नाही, त्यांच्याशी मतभेद आहे, पण मनभेद कधीही झालेला नाही.बावनकुळे यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाल्या आहेत. अनेक वर्ष मित्र असलेले उद्धव ठाकरे आज भाजप शत्रू मानत आहेत, तर अनेक वर्ष विरोधात असलेल्या शत्रूला मित्र मानत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने