आठवले अतरंगी कपडे का घालतात? स्वतःचं सांगितलं कारण, म्हणाले…

मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - आठवले पक्षाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे राजकारणासोबतच त्यांच्या कविता आणि रंग बिरंगी कपडे यांच्यासाठी ओळखले जातात . यावरून आठवले नहमी चर्चेत देखील असतात. टिपीकल नेते मंडळी घालतात तशा कपड्यांमध्ये आठवले कमीच दिसतात. पण नेमकं आठवले रंगीत सूट का घालतात या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं आहे.रामदास आठवले नेहमीच कलरफूल सूट-बुटात दिसून येतात. त्यांनी नुकतेच जनसत्ता या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण सांगितलं आहे.



आठवले यांनी सांगितलं की, मी ट्रॅडिशनल नेता नाहीये. मला पहिल्यापासूनच वेगवेगळ्या वेषभूशा करण्याची सवय आहे. मी लरफुल कपडे घालते. जेव्हा मी सोमनाथ चॅटर्जी यांच्या सोबत त्रिनिदाद आणि टोबैगो येथे गेलो होतो, तेव्हा माझी ओळख करून देताना ते म्हणत की हे आमच्या संसदेतील सर्वात कलरफुल खासदार आहे.आठवले यांनी पुढे बोलताना सांगितले की, ते स्वःचे कपडे स्वतःच खरेदी करतात. ते म्हणले की, माझे सर्व कपडे वेगळे असतात. मी कुर्ता पायजामा जास्त वेळा घालत नाही. मी सहसा कपडे मुंबई येथून घेतो दिलीमधून देखील कधी-कधी घेतो. आठवले यांनी सांगितलं की त्यांचा आवडता ब्रँड अशा नाहीये पण त्यांना वेगवेगळे कपडे घालण्याचा छंद आहे.

आठवलेंना फिक्चरमध्ये काम करायचंय

रामदास आठवले यांनी या मुलखतीत त्यांना चित्रपट पाहायला आवडते असेही सांगितलं. हिंदी चित्रपट सृष्टीतील आवडते कलाकार अमिताभ बच्चन, तर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या राय बच्चन फेवरेट असल्याचे आठवले म्हणाले. तसेच ते स्वतः देखील चित्रपटात काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील रामदास आठवले यांनी काही मराठी चित्रपटात काम केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने