पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांकडून भारताचं पुन्हा कौतुक; इम्रान म्हणाले, आम्हालाही भारताप्रमाणं..

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान  यांनी पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाचं  कौतुक केलंय.भारताप्रमाणंच इस्लामाबादलाही रशियाकडून स्वस्तात कच्चं तेल मिळवायचं होतं, पण आमचं सरकार कोसळल्यामुळं आम्ही ते करू शकलो नाही, असं ते म्हणाले.



'दुर्दैवानं माझं सरकार कोसळलं'

राष्ट्राला उद्देशून भाषण करताना पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) प्रमुख म्हणाले, 'भारताप्रमाणं आम्हालाही रशियाकडून स्वस्तात कच्चं तेल मिळवायचं होतं, पण ते होऊ शकलं नाही. कारण, दुर्दैवानं अविश्वास प्रस्तावामुळं माझं सरकार कोसळलं.'पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यावर इम्रान खान म्हणाले, 'आमचा देश सवलतीच्या दरात रशियाकडून कच्चं तेल खरेदी करू शकतो. रशिया युक्रेन युद्धाच्या परिस्थितीतही भारताला तेल देत आहे.' दरम्यान, यापूर्वी मे 2022 मध्ये इम्रान खान यांनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचं कौतुक केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने