भाजपचं टेन्शन वाढलं! पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत मविआकडून 'या' नावाची चर्चा

पुणे: गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे.काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग लवकरच या निवडणुकीची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवला जात आहे.



दरम्यान कसब्याच्या पराभवानंतर या पोटनिवडणुकीत भाजप सावधगिरी बाळगून उमेदवार उभा करणार हे स्पष्ट आहे. त्यासाठी भाजपने चाचपणी सुरू केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्याबरोबरच मविआने देखील चाचपणी सुरू केली आहे.पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकरांना या निवडणुकीत उतरवण्याची तयारी काँग्रेसची आहे. तर भाजपकडून स्वरदा बापट, मुरलीधर मोहोळ आणि संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने