'आप'च्या माजी मंत्र्याला मोठा धक्का; High Court नं जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी  तुरुंगात असलेले माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून  मोठा दणका बसला आहे.दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन  यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला आहे. या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी हा निकाल दिला.ईडीनं सत्येंद्र जैन यांच्या जामिनाला विरोध केला होता. जैन यांना जामीन मिळाल्यास या खटल्यातील साक्षीदारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं ईडीनं उच्च न्यायालयाला सांगितलं. तसंच तपासावरही परिणाम होऊ शकतो, असंही नमूद केलं होतं.



सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) गेल्या वर्षी 30 मे रोजी अटक केली होती. सध्या ते तिहार तुरुंगात आहेत. जैन यांच्यावर चार कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी आज (गुरुवार) हा निकाल दिला. 21 मार्चला उच्च न्यायालयानं तपास एजन्सी आणि आप नेत्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. जैन यांच्याशिवाय सहआरोपी वैभव जैन आणि अंकुश जैन यांचेही जामीन अर्ज कोर्टानं फेटाळले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने