महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्मश्री प्रदान; राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (५ एप्रिल) पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे बुधवारी एका विशेष कार्यक्रमात पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.मूर्मू यांनी देशातील ५५ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील ५ मान्यवरांचा समावेश आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी प्रा. दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.



या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील चार मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. सामाजिक कार्यासाठी गजानन माने आणि परशुराम खुणे यांना, कला क्षेत्रासाठी अभिनेत्री रवीना टंडन आणि कुमी वाडिया यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने