यूपीच्या कुख्यात बाहुबलीचा होतोय घटस्फोट, राजघराण्याशी संबंधित आहे राजाभैय्याची पत्नी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील कुंडा येथील आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैया आणि त्यांची पत्नी भानवी सिंह यांच्यातील वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणी आता दिल्लीतील साकेत न्यायालयात सुनावणी होणार आहे.राजा भैया आणि भानवी सिंह यांचा विवाह 1995 मध्ये झाला होता. 28 वर्षांनंतर दोघे आता वेगळे होणार आहेत. भानवी सिंहने राजा भैय्याचा धाकटा भाऊ अक्षय प्रताप सिंह उर्फ ​​गोपालजी याच्यावर गुन्हा दाखल केला होता.यावर राजा भैय्या यांनी अक्षय प्रतापचे समर्थन करत त्याच्या मागे उभा राहिला. दरम्यान, राजा भैय्याने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. राजा भैय्याने पत्नी भानवीवर घरात भांडण आणि कलहाचा आरोप केला आहे.

कोण आहे भानवी सिंग?

भानवी सिंह बस्तीच्या राजघराण्यातील आहे. त्यांचा जन्म 10 जुलै 1974 रोजी बस्ती राजघराण्यात झाला. कुंवर रविप्रताप सिंह यांना चार मुली आहेत. भानवी त्यांची तिसरी मुलगी.त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बस्तीमध्येच झाले. त्यांनी बस्तीमधूनच आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर भानवी पुढील शिक्षणासाठी आई मंजुलसोबत लखनौला गेली.भानवी सिंहने 1995 मध्ये रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैयाशी लग्न केले. राजा भैय्या हा प्रतापगढच्या राजपूत भद्री संस्थानातील राजा उदय प्रताप सिंह यांचा मुलगा आहे. राजा भैया आणि भानवी हे चार मुलांचे पालक आहेत.



लग्नाच्या एका वर्षानंतर भानवी सिंहने 1996 मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु दुर्दैवाने दोघींपैकी एकीचा मृत्यू झाला. यानंतर 1997 मध्ये भानवीने मुलीला जन्म दिला.2003 मध्ये भानवी सिंगने जुळ्या मुलांना जन्म दिला. राजा भैया आणि भानवी सिंह यांना शिवराज आणि ब्रिजराज नावाचे दोन मुलं आणि राघवी आणि विजय राजेश्वरी नावाच्या दोन मुली आहेत.

राजा भैय्या आणि भानवीच यांची किती आहे संपत्ती?

2022 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राजा भैय्या यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 23.24 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे जाहीर केले होते.प्रतिज्ञापत्रानुसार, राजा भैया यांच्याकडे 13.64 कोटी रुपयांची आणि पत्नी भानवी सिंह यांच्याकडे 6.08 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. उर्वरित मालमत्ता त्यांच्या चार मुलांकडे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने