जम्मू-काश्मीरनंतर आता कर्नाटकात सापडलं लिथियम, ईव्ही सेक्टरला मिळणार बूस्ट

जम्मू-काश्मीर: फेब्रुवारी 2023 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडले होते आणि आता कर्नाटक हे दुसरे राज्य बनले आहे जेथे लिथियमचे साठे सापडले आहेत. भारताच्या विविध भागात लिथियमचे साठे सापडल्याच्या बातम्या येत आहेत.लिथियम हे एक असे खनिज आहे ज्याचा वापर लॅपटॉप आणि मोबाईल फोनमध्ये दिलेल्या बॅटरीमध्ये तर होतोच शिवाय इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅटरीमध्ये देखील याचा वापर होतो. कर्नाटकातील मारलागल्ला भागात (मंड्या जिल्हा) लिथियमचा साठा सापडला आहे. जम्मू-काश्मीरनंतर केंद्र सरकारने कर्नाटकात लिथियम मिळाल्याची माहिती लोकसभेत दिली आहे.कर्नाटकात लिथियमचा साठा सापडल्यानंतर खाण आणि कोळसा मंत्रालयाने संसदेत माहिती दिली की, अणुऊर्जा विभागाने तपासणी केली असून मंड्या जिल्ह्यात लिथियमचा साठा सापडला आहे. त्यात लिथियमचे प्रमाण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.



जम्मू-काश्मीरच्या या जिल्ह्यात सापडले होते लिथियम

कर्नाटकात लिथियमचे साठे सापडण्यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील सालाल हैमना येथे लिथियमचे साठे सापडले होते.

ईव्ही क्षेत्राला मिळणार बूस्ट

भारतात लिथियमच्या उपलब्धतेमुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला मोठा बूस्ट मिळू शकतो. आतापर्यंत भारत लिथियमसारख्या महत्त्वाच्या वस्तू बाहेरून आयात करायचा, परंतु आता जम्मू-काश्मीर आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये लिथियमची उपलब्धता असल्याने बॅटरी निर्माते आणि ईव्ही कंपन्यांना आयातीवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने