राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांना मोठा दिलासा; 27 एप्रिलपर्यंत अटकेपासून मिळालं संरक्षण

कोल्हापूर: राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांबाबत  मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयानं  मनी लाँड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफ यांना अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण कायम ठेवलं आहे. त्यांना 27 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाल्यामुळं मोठा दिलासा मिळालाय. ईडीनं उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्यायालयानं मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम ठेवलं आहे.



मुश्रीफांवर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा ( झाल्याचा आरोप आहे. हसन मुश्रीफ यांनी 2011 साली मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करुन स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पैसे जमा केले होते. जवळपास 38 कोटींपेक्षा जास्त रक्कम ती होती. या पैशांमध्ये साखर कारखाना सुरु करुन त्यांना शेअर्समध्ये सामावून घेण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. पण, ते पैसे मुश्रीफांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले, असा आरोप करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने