आई-वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी बायको दबाव आणतेय? तर कोर्टाचा 'हा' निर्णय दाखवा

कोलकाताः भारतीय संस्कृतीमध्ये मुलाने आई-वडिलांचा सांभाळ करणं कर्तव्य समजलं जातं आणि ही अत्यंत सामान्य बाब आहे. असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं असून एका पत्नीपीडित पतीला दिलासा दिला आहे.पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील पश्चिम मिदानपूर येथील हे प्रकरण आहे. हायकोर्टाने पत्नीच्या क्रूरतेमुळे पतीला पत्नीपासून घटस्फोट दिला. पत्नी सार्वजनिकरित्या बदनामी करते, घरखर्चासाठी पुरेसे पैसे नाहीत म्हणून आई-वडिलांपासून वेगळं राहण्याचा हट्ट धरते आणि दुसरीकडे घर घेण्याचा आग्रह धरते त्यामुळे पतीने घटस्फोटासाठी कोर्टामध्ये धाव घेतली होती.



यासंदर्भात कौटुंबिक कोर्टाने सुप्रीम कोर्टाचा हवाला दिला आहे. २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता. त्यामध्ये आई-वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी पत्नीने पतीचा छळ चालवला होता. त्यामुळे पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. कोर्टाने हे कारण घटस्फोटासाठी पुरेसे असल्याचं नमूद केलं होतं.याच प्रकरणाचा हवाला देत मिदानपूर प्रकरणात कोर्टाने पतीला पत्नीपासून घटस्फोट दिला आहे. २००१मध्ये या दाम्पत्याचं लग्न झालं होतं. मात्र पत्नी पैशांचं कारण देऊन आई-वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी हट्ट धरत होती. कोर्टाने हे कारण गंभीर असल्याचं म्हणत पतीची पत्नीच्या जाचातून मुक्तता केली.कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की, आई-वडिलांची काळजी घेणं ही मुलाची जबाबदारी असून भारतामध्ये लग्नानंतर आई-वडिलांसोबत मुलाने राहाणे ही सामान्य बाब आहे. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत निर्णय दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने